नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय कॉंग्रेसचे खा.राहुल गांधी यांच्यावर सुडबुद्धीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी तळोदा तालुका कॉंग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयाच्या आवारात केंद्र सरकारच्या विरोधात काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी तहसीलदार गिरीष वखारे यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसतर्फे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार सोमवारी माजी मंत्री क्रीडा मंत्री ऍड.पद्माकर वळवी यांच्या नेतृत्वात तळोदा तहसील कार्यालय परिसरात कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते यांनी खा. राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून निदर्शने केली. केंद्र सरकारने हुकूमशाही पद्धतीने खा.राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करुन त्यांचा लोकसभेतील आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु असून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा लोकशाही वरील हल्ला आहे.
सत्तेचा दुरुपयोग करुन विरोधी पक्ष नेत्यांना लक्ष करुन भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत तत्व व विचार या विरुध्द सरकारची वाटचाल सुरु असल्याचे यावेळी माजी मंत्री ऍड.पद्माकर वळवी यांनी सांगितले. लोकशाही विरोधी कृत्याचा जाहिर निषेध करण्यासाठी तळोदा कांग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.त्यानंतर तहसीलदार गिरीष वखारे याना निवेदन देण्यात आले.
यावेळी पद्माकर वळवी यांच्या सह जि.प सदस्या ऍड.सिमा वळवी, निशा वळवी, तालुका अध्यक्ष नाथ्या पावरा, माजी समाज कल्याण सभापती नरहर ठाकरे, रोहिदास पाडवी, अर्जुन पाडवी, राणापूर सरपंच दिनेश पाडवी, रेवानगर सरपंच हिरालाल पाडवी, ईच्छागव्हाण सरपंच दिपक पाडवी, माजी नगरसेवक सतीवान पाडवी, प्रकाश ठाकरे, धर्मेंद्र पाडवी, माजी पंचायत समिती उपसभापती दिपक मोरे, पंचायत समिती सदस्य हिलाबाई पाडवी, महेंद्र पाडवी, सचिन राहसे, अशोक पाडवी, दारासिंग मढवी, पाण्या वळवी, कादर पावरा, बिंदा पावरा, उदेसिंग पावरा, इमरान शेख, हिरालाल पावरा, बाबू सिंग नाईक,राहुल पावरा, रमेश पाडवी,पुनमचंद वळवी,जीवन पावरा, लक्ष्मण नाईक भगवान पाडवी, भाऊजी पाडवी, सदाशिव ठाकरे, विनोद पाडवी, महेंद्र पाडवी,भाऊराव बिरारे आदी उपस्थित होते.








