Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गावाचा विकास लोकसहभागातूनच होऊ शकतो: भास्करराव पेरे पाटील

team by team
March 26, 2023
in राजकीय
0
गावाचा विकास लोकसहभागातूनच होऊ शकतो: भास्करराव पेरे पाटील
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील ग्रामपंचायतीचा ६९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून आदर्श गाव पाटोदा जि.छत्रपती संभाजी नगरचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील होते.
कार्यक्रमास गटविकास अधिकारी जयवंत उगले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सेवानिवृत्त आयुक्त यशवंत पवार, जि.प सदस्य देवमन पवार, डॉ सयाजीराव मोरे, पं.स.सदस्य कमलेश महाले, संतोष साबळे,ठाणेपाडाचे सरपंच विशाल पवार,ग्रामविकास अधिकारी आर.एन.बैसाणे, परिसरातील गावांतील सरपंच,उपसरपंच,सदस्य उपस्थित होते.
सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग ५ टक्के निधीतुन दिव्यांगाना खुर्च्या वाटप करण्यात आल्या.शालेय विद्यार्थी, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावातील अधिकारी,कर्मचारी,व समाजसेवक यांचा स्मृतीचिन्ह देउन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी भास्करराव पाटील यांनी आपल्या जिवनात आलेले सामाजिक राजकीय प्रंसग व गावाचा विकास लोकसहभागातून आपल्या ग्रामपंचायत मार्फत कसा शक्य आहे ते उदाहरणासह स्पष्ट केले. गाव हगणदारी मुक्त,गांवातील स्वछता,झाडे लावणे, ग्रामपंचायतची कर वसुली, व गावाचा विकासासाठी सरपंच, ग्रामसेवक,यांना विकास कामात गावकऱ्यांनी मदत करावी असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित सरपंचांचा भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक यशवंत पवार यांनी तर आभार देवमन पवार यांनी मानले. यावेळी महिला, युवक, युवती, विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे खा.राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन

Next Post

माजी आ.चंद्रकांत रघुवंशींनी फुंकले बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग

Next Post
माजी आ.चंद्रकांत रघुवंशींनी फुंकले बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग

माजी आ.चंद्रकांत रघुवंशींनी फुंकले बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add