नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा सहयोग सोशल ग्रुप व मेवासी वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेवासी वनविभागाचे उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रकल्प तथा प्रांत अधिकारी मंदार पत्की, सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲड अल्पेश जैन, पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल, वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे, उपाध्यक्ष डॉ.संदीप जैन, डॉ. योगेश बडगुजर, डॉ.महेश मोरे, डॉ.सुनील लोखंडे, वनक्षेत्रपाल लहानगे, भूषण पाटील, प्रा.रमेश मगरे, अशोक सूर्यवंशी, पंडित भामरे, प्रा.राजाराम राणे, रमेश भाट आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रांत तथा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की म्हणाले की, पक्षी आणि माणूस यांचा समतोल राहिला तर निसर्गाच्या समतोल राहील, आपल्याला आई काऊ चिऊच्या गोष्टी लहानपणी सांगत असे आज चिमण्याची संख्या झपाट्याने कमी होत आहे. चिमण्याची संख्या वाढविण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण करणे हे माणूस म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तसेच सहयोग सोशल ग्रुपच्या कार्याची प्रशंसा करून त्यांनी निसर्गालापूरक विविध उपक्रम राबवण्यासाठी प्रकल्प कार्यालयातर्फे निधी देण्याची आश्वासन दिले. याप्रसंगी मान्यवराच्या हस्ते बर्ड फिडरचे वाटप करण्यात आले. तसेच विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन बर्ड फिडर लावण्यात आले.
तसेच याप्रसंगी बोलताना सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲड अल्पेश जैन यांनी बोलतांना सांगितले की, सद्यःस्थितीत झपाट्याने गावाचे शहरीकरण होत असताना चिमण्याची कमी होणारी संख्या त्याचे दुष्परिणाम या वरील योजावायचे उपाय, करावयाचे सामाजिक प्रबोधन यांची गरज असल्याने सांगितले, तसेच कमी होत चाललेली जंगले, वाढती मोबाईल टॉवर्स यामुळे दिवसेंदिवस चिमणीची संख्या कमी होत आहे त्यासाठी चिमण्याचे संवर्धन करणे खूप गरजेचे आहे. तसेच ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश मगरे, वन क्षेत्रपाल स्वप्नील भामरे, पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांनी मार्गदर्शन केले.
उपवन संरक्षक लक्ष्मण पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, झपाट्याने चिमण्याचे संख्या कमी होत असून त्यांच्या अधिवास वाढवण्याचा प्रयत्न करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे ही एक सामाजिक चळवळ झाली पाहिजे, चिऊ ताईच्या चिव चिवट पुन्हा एकावास वाटतो ना त्याला पर्यावरण रक्षणाच्या लढा अधिक भक्कम करू या, पक्षी वाचवूया निसर्गाचे सौंदर्य वाढवूया, चिमण्याचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती करणे, जंगल वाढवणे, प्रदूषण संपविणे खूप गरजेचे आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वनक्षेत्रपाल स्वप्निल भामरे यांनी केले.
तर सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲड अल्पेश जैन यांनी कार्यक्रमाचा उपस्थितांच्या आभार मानले. या कार्यक्रमास सहयोग सोशल ग्रुपचे यादव जीरे, रविंद्र चव्हाण, चेतन शर्मा, कुशल जैन, राज जैन, मोईन पिंजारी, प्रमोद जहांगीर, सजन जहांगीर, राकेश भोई, सोहेल पिंजारी, दीपक पवार, गणेश पाटील तसेच मेवासी वन विभागाचे गिरधन पावरा, दिपक बाळदे आदींसह वन विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.