Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गंभीर प्रकार उघड:बनावट शिक्के मारुन देत होते विविध प्रमाण पत्र, पोलीसांनी केली तिघांना अटक

team by team
March 21, 2023
in क्राईम
0
तलावडी येथे दुचाकींच्या धडकेत दोघांना दुखापत
नंदूरबार l प्रतिनिधी
दिव्यांगांना महसूल, ग्रामविकास, परिवहन महामंडळाकडून विविध सवलतींसाठी दिल्या जाणार्‍या कागदपत्रांवर बनावट शिक्के मारुन शासनाची फसवणूक  केल्याप्रकरणी शहादा पोलीसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघांना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा शहरात अनेक दिवसांपासून दिव्यांगांना महसूल, ग्रामविकास, परिवहन महामंडळाकडून देण्यात येणार्‍या सवलतींच्या प्रमाणपत्रांवर अवैधरितया बोगस शिक्के मारुन देणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शहादा येथील पोलीस पथकाने शहरात तपास करुन शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका कटलरीच्या दुकान तसेच कापडाच्या दुकानात व घरी धाडी टाकल्या. यात कापडाच्या दुकानात अनेक बनावट रबरी स्टॅम्प, खोटया पासेस आढळून आल्या आल्या.
यात अपंग, कर्णबधीर आदींचे बनावट प्रमाणपत्रदेखील आढळून आले. याठिकाणी खोटे प्रमाणपत्र, दस्तावेज तयार करुन शासनाच्या विविध सवलतींचा लाभ दिला जात होता. आतापर्यंत शेकडो जणांना या बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ दिला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. याची व्याप्ती मोेठी असण्याची शक्यता आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मुनिका पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संदीप उर्फ संतोष गोरख पानपाटील, महेंद्र सिताराम वाघ व सुनिल चौधरी सर्व रा.शहादा यांच्याविरुद्ध भादंवि कलम 420, 465, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा पोलीसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दि. 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नंदुरबार जिल्हा कार्यालय आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते उद्घाटन 

Next Post

जागतिक चिमणी दिवस साजरा, सहयोग सोशल ग्रुप तर्फे बर्ड फिडर वाटप व जनजागृती

Next Post
जागतिक चिमणी दिवस साजरा, सहयोग सोशल ग्रुप तर्फे बर्ड फिडर वाटप व जनजागृती

जागतिक चिमणी दिवस साजरा, सहयोग सोशल ग्रुप तर्फे बर्ड फिडर वाटप व जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add