नंदुरबार l प्रतिनिधी –
नंदुरबार शहरातील अलीसाहब मोहल्ला परिसरात ॲल्यूमिनिअम सेक्शनचे काम करत असतांना अचानक विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील अलीसाहब मोहल्ला येथील मोनीस शेख शकील हलवाई हे काल दि.१९ रोजी नंदुरबार शहरातील प्रताप नगर येथील एका नव्या घराचे ॲल्यूमिनिअम सेक्शनचे काम करत होते. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्यांना अचानक विजेचा जबर धक्का लागला. यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
तेथे डॉ.नितीन पाडवी यांनी तपासणी करुन त्यांना मयत घोषीत केले. याबाबत अकिल शेख याकूब हलवाई यांच्या खबरीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ.वसंत वसावे करीत आहेत.








