नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील खरवड घाटाच्यापुढे दुचाकी घसरल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील चोंदवाडे येथील कपिल किसन पावरा हा दुचाकीने (क्र.जी.जे.१९ ६२३२) अंग्रेशा पावरा यांना बसवून चोंदवाडे बु. येथून धडगावकडे जात होते. यावेळी निमझरी गावाकडे जाणाऱ्या पायवाटेच्या वळणावरील रस्त्यावर कपिल पावरा याने दुचाकी भरधाव वेगात चालविल्याने दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडल्याने कपिल पावरा याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
तर अंग्रेशा पावरा यांना दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत किसन मान्या पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.कालूसिंग पाडवी करीत आहेत.