Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाच्या माध्यमातून श्रॉफ हायस्कूलच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा

team by team
March 19, 2023
in राज्य
0
इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाच्या माध्यमातून श्रॉफ हायस्कूलच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा
नंदुरबार l प्रतिनिधी
 भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग व नॅशनल इनोव्हेटिव्ह फाउंडेशन गुजरात द्वारा आयोजित इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन आयोजित करण्यात येते याची नोंडेल एजन्सी म्हणून महाराष्ट्रामध्ये राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर ही आहे.
गेल्या महिन्यात राज्य स्तरीय इन्स्पायर अवॉर्ड  ऑनलाइन पद्धतीने प्रदर्शन भरविण्यात आले होते त्यात नंदुरबार जिल्ह्यातून श्रॉफ हायस्कूलचा विद्यार्थी दीप योगेश पाटील यांच्या लेबर्स फ्रेंड नावाच्या उपकरणाची  राज्यस्तरावर क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली. या विद्यार्थ्याला विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ. चेतना दिनेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर उपकरण तयार करताना डोक्यावर ओझे वाहणाऱ्या मजुरांचा, डोक्यावर ओझे ठेवून विक्री करणाऱ्यांचा तसेच घरातील महिला हिला भरलेले सिलेंडर उचलण्यासाठी होणाऱ्या त्रासाचा विचार करण्यात आलेला आहे.हे उपकरण तयार करताना अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांशी प्रत्यक्ष संवाद साधून तसेच नंदुरबार येथील नामांकित अस्थिरोगतज्ञ डॉक्टर सुनील पाटील यांची भेट घेऊन, अशाप्रकारे ओझी उचलल्यामुळे होणाऱ्या पाठीमागील हाडांच्या तक्रारी समजून घेतल्या व त्यावर उपाय म्हणून सरळ डोक्यावर ओझे न उचलता त्या ओझ्या चे वजन खांद्यावर तसेच कमरेवर विभागले जाऊन हा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला.
सदर उपकरणात तीन मॉडेलचा समावेश करण्यात आलेला आहे. पहिल्या उपकरणात वजन डोक्यापासून वरती राहील  व ती व्यक्ती दोन्ही हातने रॉड धरून चालू शकेल अशा पद्धतीने योजना करण्यात आलेली आहे, जेणेकरून हे वजन खांद्यांवर येईल व वजन उचलणाऱ्या व्यक्तीला डोक्यावर कुठलाही त्रास जाणवणार नाही.
यातील दुसरे मॉडेल असे बनवले आहे की थोडे वजन खांद्यावर व थोडे वजन कमरेवर येईल  आणि हात सुद्धा मोकळे राहतील.
तिसरे मॉडेल हे खास  महिलांसाठी बनवले आहे. या मॉडेलमध्ये चाकांची हाताने ओढता येईल अशी एक गाडी बनवली असून तिला एक हूक लावलेला आहे जेणेकरून या हुक मध्ये सिलेंडरची रिंग अडकवली की ते सिलेंडर या गाडीवर ठेवता येते व ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते. याचा उपयोग गाडीमधून सिलेंडर घरापर्यंत आणणाऱ्या सिलेंडर वाहकाला सुद्धा होणार आहे.
या सर्व कारणांमुळे मार्गदर्शक शिक्षिका चेतना पाटील यांनी या उपकरणाला कामगारांचा  मित्र असे नाव दिले आहे.विद्यार्थी दीप योगेश पाटील व मार्गदर्शक शिक्षिका चेतना पाटील यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्थेचे चेअरमन ॲड.रमणभाई शाह, संस्थेचे सचिव डॉ. योगेश देसाई, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा शाह, उप मुख्याध्यापक  राजेश शाह, पर्यवेक्षक  विद्या सिसोदिया व जगदीश पाटील तसेच सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी
यशस्वी विद्यार्थी दीप योगेश पाटील व त्याच्या मार्गदर्शिका चेतना पाटील यांचे अभिनंदन केले व राष्ट्रीय स्तरासाठी शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करा
Previous Post

खर्द खुर्द येथे शिबिरात ७० जणांची मोफत तपासणी

Next Post

खरवड घाटाच्यापुढे दुचाकी घसरल्याने एकाचा मृत्यू तर एक जखमी

Next Post
तलावडी येथे दुचाकींच्या धडकेत दोघांना दुखापत

खरवड घाटाच्यापुढे दुचाकी घसरल्याने एकाचा मृत्यू तर एक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add