अक्कलकुवा । प्रतिनिधी
वाण्याविहीर विरपुर रस्त्याच्या बाजुला असलेल्या उसाच्या शेताच्या बांधांवर बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती युक्त वातावरण पसरले आहे. बुधवारी सदर रस्त्यावरुन जाणाऱ्या युवकांनी आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ तयार करुन बिबट्या सदृश प्राण्याला कॅमेरात कैद केले.
बुधवारी संध्याकाळ पासुनच वातावरणात बदल होवुन परिसरात सोसाट्याचा वारा सुरु होऊन जोरदार पावसाचे वातावरण तयार झाले त्यातच विजपुरवठा खंडीत होवुन पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पाऊस ही गायब झाला होता त्यामुळे गावात किर्रर्र अंधार असताना रात्री साडे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास वाण्याविहीर ते विरपुर रस्त्यावर बी.सी.होस्टेल जवळुन जाणाऱ्या तरुणांना विरपुर रस्त्यावरील नरेश यादव यांच्या उसाच्या शेतातील बांधांवर पाईपलाइनच्या स्विच बोर्डाजवळ बिबट्या सदृश प्राणी असल्याचे दिसुन आले.
तो प्राणी पाईपलाइन जवळील स्विच बोर्डावर चढुन वास घेऊन कशाचा तरी शोध घेत असल्याचे दिसुन आले.प्राण्याला पाहणाऱ्या तरुणांनी सावधगिरी बाळगत बिबट्या सदृश प्राण्याच्या हालचाली आपल्या मोबाईल मध्ये टिपल्या. व गावा शेजारील शेतात बिबट्या काही तरी शोधत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्याने बिबट्या गावात आल्याची एकंच चर्चा रंगली होती त्यामुळे आजू बाजुच्या शेतातील शेतकऱ्यां मध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.व व्हिडिओत दिसलेल्या बिबट्याचा शोध घेऊन त्यास जेरबंद करण्याची मागणी होत आहे.