नंदुरबार l प्रतिनिधी
स्टार्स प्रकल्प अंतर्गत मुख्याध्यापक सक्षमीकरण संपन्न प्रशिक्षण” अंतर्गत इ. १ ली ते १२ वीच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य यांची PLC (Professional Learning Community) व्यावसायिक अध्ययन समूह सहविचार सभा बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे संपन्न झाली.
या सभेचे उद्घाटन निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्या हस्ते आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर व वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी, अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी मुख्याध्यापकांच्या कार्यक्षमतेवर शैक्षणिक प्रक्रिया अवलंबून असून त्यासाठी मुख्याध्यापकांनी काळानुसार बदललेल्या शैक्षणिक बाबींची माहिती करून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
राज्यातील शालेय स्तरावर अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि अपेक्षित परीणाम याचे बळकटीकरण करण्यासंदर्भात जागतिक बँक अर्थसहाय्यीत, केंद्र पुरस्कृत Strenthening Teaching – Learning And Results for States (STARS) या उपक्रमांतर्गत मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण सुरु आहे. सदर उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था,शासकीय, शासकीय अनुदानित, खाजगी, समाज कल्याण विभाग, आदिवासी कल्याण विभागाच्या इ. १ ली ते १२ वीच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींचे Infosys च्या Springboard App वर MEIPA च्या माध्यमातून Online प्रशिक्षण सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील
मुख्याध्यापक / प्राचार्य यांची PLC (Professional Learning Community) व्यावसायिक अध्ययन
समूह आहे.
सदर सभेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.जगराम भटकर यांनी मुख्याध्यापकांनी आपल्या कार्य कौशल्यामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टींची भर घालून आपले कार्य पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
सदर सभेचे नियोजन जिल्हा नोडल अधिकारी तथा राज्य सुलभक डॉ. राजेंद्र महाजन यांनी केले. तसेच सदर सभेसाठी राज्यस्तरीय सुलभक म्हणून केंद्रप्रमुख उदय बोरसे, निंबा पाकळे व मुख्याध्यापक भटू बंजारा यांनी प्रशिक्षणातील विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. इन्फोसिस च्या अँप वर लॉगिन करून ऑनलाईन प्रशिक्षण कसे सुरु करावे? स्वाध्याय अपलोड कसा करावा, मुख्याध्यापक सक्षमीकरण होण्यासाठी कोणते कौशल्य व क्षमता विकसित करता येतील याबाबत उदबोधन केले. प्रशिक्षण सह समन्वयक म्हणून विषय तज्ञ ज्ञानेश्वर पाटील यांनी कामकाज करून यशस्वीरित्या सभा संपन्न झाली.