Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तलावीपाडा गावात प्रेमयुगलाची आत्महत्या

team by team
September 17, 2021
in क्राईम
0

नंदुरबार | प्रतिनिधी-

तलावीपाडा ता.नवापूर येथे शेतातील राहत्या घरात सर्‍याला दोर बांधून प्रेमीयुगलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील शेगवे येथील  १९ वर्षीय युवकाचे गावातील एका १६ वर्षीय नात्यातील मुलीशी प्रेमसंबध जुळले. परंतु दोघे एकमेकांचे नातेवाईक असल्याने आपले लग्न होऊ शकत नाही म्हणून दि.१२ सप्टेंबर २०२१ रोजी कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांना काही न सांगता निघून गेले होते. त्यानंतर दि.१६ सप्टेंबर २०२१ रोजी नैराश्यातून या प्रेमीयुगलाने नवापूर तालुक्यातील तलावीपाडा गावाच्या शेतात रखवालदारासाठी बांधण्यात आलेल्या घरात सर्‍याला दोर बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. दि.१६ रोजी दुपारी शेजारील शेताच्या एक शेतकरी गवत कापत असताना त्याला घरातून दुर्गंधी येत असल्याने त्याने खिडकीतून पाहिले असता त्याला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यानंतर संध्याकाळी विसरवाडी पोलीस ठाण्यात माहिती दिली.
विसरवाडी गावात सातव्या दिवसाचा गणेश विसर्जन मिरवणूकीचा बंदोबस्त आटोपून विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलिस उपनिरीक्षक भुषण बैसाणे, पो.ना.अनिल राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतातील घराचे दार उघडून पाहिले असता युवक व युवतीचे कुजलेले मृतदेह सर्‍याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. दोघांनी तीन ते चार दिवसांपुर्वी आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी पोलीसांनी पंचनामा केला  आहे. दोघांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार नंतर तळोदा तालुक्यात आढळला कोरोना रूग्ण

Next Post

रतय शेतकरी संघटनेच्या कोअर कमिटी सदस्यपदी राहुल सोनार यांची निवड

Next Post
रतय शेतकरी संघटनेच्या कोअर कमिटी सदस्यपदी राहुल सोनार यांची निवड

रतय शेतकरी संघटनेच्या कोअर कमिटी सदस्यपदी राहुल सोनार यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add