तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथील चंद्रकांत विठ्ठल कर्णकार यांचा शेतात बिबट्याच पिल्लु आढळल्या बाबत प्राथमिक माहिती मिळाली या बाबत वन विभागाला माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी दखल झाले. मात्र वन विभगाचा कर्मचारी कडून सदर पिल्लु बिबट्या चे की रान मांजर चे या बाबत आकाराने लहान असल्याने खात्री होत नव्हती दरम्यान या बाबत वन्य जीव आभ्यासक सागर निकुंभ यांना बोलवण्यात आले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्या नंतर सदर पिल्लु हे बिबट्या चे नसून रान मांजर चे असल्याचे सिद्ध झाले
सदर पिल्लु हे दहा ते पंधरा दिवसांचे असून पीक काढणी नंतर सदर पिल्लु मजुरांना दिसले या बाबत शेत मालकाला कळविण्यात आले.
सदर क्षेत्र हे सुशीला श्रीराम नगर तसेच जोशी नगर सोबतच गाव वस्ती पासून हाकेचा अंतरावर आहे. यावेळी
वासुदेव माळी वन पाल राजविहिर.वीरसिंग पावरा वनरक्षक .राहुल कोकणी.वनरक्षक . चालक दिपक बळदे उपस्थित होते .
रानमांजर शेत शिवारात वास्तव्यास असतात
रानमांजरीचा समावेश वन्यप्राणी अनुसूची क्रमांक दोनमध्ये होतो. रानमांजर महाराष्ट्रात जवळजवळ सर्वच जिल्ह्यात आढळते. गवताळ जमीन, नदी ,नाले, ओढे, दलदलीचा प्रदेशातील झुडूप किंवा वेताच्या जाळ्यात रानमांजरे राहतात. रानमांजराची मोकळ्या मैदानातील हालचाली एखाद्या छोट्याशा बिबट्यासारख्या आहेत. त्या विलक्षण चपळ असतात. रानमांजर सकाळी किंवा संध्याकाळी शिकारीस बाहेर पडतात. उंदीर, सायाळ, पक्षी, लहान आकाराचे सस्तन प्राणी, कोंबड्या हे त्यांचे प्रामुख्याने खाद्य आहे.
तळोदा तालुक्यात उंमरी गुजाळी शिवारात नऊ महिन्यापूर्वी दोन पिल्ले सापडली होती त्या वेळी देखील बिबट्या की रान मांजर प्रश्न उपस्थित झाला होता.सागर निकुंभे , मानद वन्यजीव रक्षक तथा अध्यक्ष वन्यजीव संरक्षण संस्था, नंदुरबार, व पूनम भावसार सदर पिलाची देखरेख करत आहेत.