नंदुरबार | प्रतिनिधी
पाणी फाऊंडेशनतर्फे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ’सत्यमेव जयते, फार्मर कप २०२२’ च्या पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा रविवारी पार पडला. राज्यस्तरीय फार्मर कप स्पधेत नंदुरबार तालुक्यातील न्याहली गावाने पुरस्कार मिळवला.
आमिर खान यांनी पानी फाऊंडेशनची कल्पना मांडली. इतकेच नव्हे तर पाणी फाऊंडेशनने सातत्य दाखवत जलसंधारण अणि शेतकर्यांना समर्थ करण्याचे कार्य केले आहे.
आधी वॉटर कपच्या माध्यमातून जलस्वयंपूर्ण गावे तयार केली. आता फार्मर कपच्या माध्यमातून विषमुक्त शेती आणि शेतकर्यांचे गट तयार करून महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचे सुंदर मॉडेल तयार केले आहे. पानी फाऊंडेशनने शेती क्षेत्रात क्रांती आणली असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. पाणी फाऊंडेशनतर्फे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ’सत्यमेव जयते, फार्मर कप २०२२’ च्या पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा रविवारी पार पडला.
त्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला पानी फाऊंडेशनचे संस्थापक आमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, पदमश्री पोपटरावर पवार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेते अतुल कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, कृषी सचिव एकनाथ डवले. अभिनेते अतुल कुलकर्णी, सहयाद्री ग्रो फार्मचे विकास शिंदे, राहूरी कृषी विद्यापीठाचे कुलगूरू डॉ.प्रशांत पाटील, पंजाबराव कृषी विदयापीठाचे कुलगूरू डॉ.शरद गडाख आदी उपस्थित होते. नीरज नारकर व स्पृहा जोशी यांनी सुत्रसंचालन केले.