नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी आगामी निवडणुका व संघटनात्मक दृष्ट्या बदल घडवीत शहरातील पदाधिकाऱ्यांना पदोन्नतीचे पत्र देऊन सन्मानित केले.
मागील गेल्या काही काळात नंदुरबार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य हे असमाधानकारक असल्याने, नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार नंदुरबार शहर राष्ट्रवादीची कार्यकारणी ही बरखास्त केली होती, त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुका व संघटनात्मक दृष्ट्या बदल घडवीत, नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सचिवपदी नितीन रोहिदास जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर नंदुरबार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहरअध्यक्षपदी नंदुरबार नगर पालिकेचे माजी प्रतोद मोहन रायभान माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे,
त्याचप्रमाणे नंदुरबार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी कमलेश दिलीप चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, या नियुक्ती कार्यक्रमाप्रसंगी घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत त्यांनी त्यांना नियुक्त पत्र देऊन पुढील कार्यकाळासाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत, यावेळी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात हा पद नियुक्तीचा कार्यक्रम नंदूरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला,
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव राऊ मोरे, जितेंद्र खांडवे, माजी नगरसेवक प्रकाश भोई, जगदीश जयस्वाल, लल्ला मराठे, रवींद्र जावरे, निलेश चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमास उपस्थित होते, यावेळी नवनिर्वाचित नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव नितीन जगताप, शहराध्यक्ष मोहन माळी, नंदुरबार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष कमलेश चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.








