नंदुरबार l
नवापूर शहरातीला हॉटेल गार्डनजवळ मालट्रकने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी मालट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील करंजी ओवरा येथील दिनेश लखमा मावची हे कामावरुन घरी येत होते. यावेळी कृष्णमुर्ती गोविंदन (रा.गांधीपुरम कॉलनी, दासानाईकेनप्टट्टी ता.जि.सेलाम, तामिळनाडू) याने त्याच्या ताब्यातील मालट्रक (क्र.टी.एन. ३४ एएक्स ३१६३) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात मालट्रक चालवून हॉटेल गार्डनजवळ दिनेश मावची यांना धडक दिल्याने गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत दिनेश प्रभाकर पाटील यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात मालट्रक चालक कृष्णमुर्ती गोविंदन याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युवराज परदेशी करीत आहेत.








