नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे होळी उत्सवातील श्री.जगदंबा देवी अवताराची सवाद्य मिरवणूक १२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरून काढण्यात येऊन रात्री बारा वाजेला श्री गणपती मंदिराच्या प्रांगणात सांगता होणार आहे.यासाठी श्री. जगदंबा देवी मिरवणुकीसाठी मांगल्य सेवा संस्थेने जय्यत तयारी सुरू केली आहे.
नंदूरबार येथील कै. श्री. भास्करराव जोशी यांचे राहते घर कमानी दरवाजा येथून सायंकाळी ६ वाजता जगदंबा देवीच्या अवतार मिरवणुकीला प्रारंभ होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात होळी प्रदक्षिणा केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी चौकाजवळ जुने मधुरम हॉस्पिटलच्या बाजूला स्टेजवर माता विराजमान होईल. याठिकाणी भाविकांना दर्शन घेता येईल. जळका बाजार पोस्टाच्या गल्ली समोर स्टेजवर अंबिका माता विराजमान होईल व भाविकांना या ठिकाणी दर्शन घेता येईल.
असा असेल मार्ग
नंदूरबार येथील जळका बाजार, नगर परिषद टॉवर समोर, जळका जळका बाजार मुख्य चौकातील स्टेज, टिळकपथ, कालाणी यांचे घराजवळील मारुती मंदिरा शेजारी स्टेजवर दर्शन, शिरीष मेहता रोड, होळी प्रदक्षिणा व जनक आभूषण जवळ स्टेजवर विराजमान सराफ बाजार, टिळक पथ, फडके चौक येथे स्टेजवर विराजमान, गुळवाडी जवळ स्टेजवर विराजमान दर्शन बालाजी वाडा, होळी प्रदक्षिणा व बालाजी मंदिरासमोर, सोनार खुंट, संकट मोचन मारुती चौक, विठ्ठल मंदिर चौक, श्री गणपती मंदिरात विसर्जन होईल, अशी माहिती मांगल्य सेवा संस्थेचे सुहास जानवे यांनी दिली.
बालाजी वाड्यातील गोविंदबुआ रोकडे यांनी सुरू केलेली श्री जगदंबादेवीची मिरवणुकीची प्रथा महाराज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर खंडित होणार होती. परंतू श्री जगदंबा देवीची ही प्रथा शहराचे भुषण असून ती पुढे सुरू राहावी, म्हणून मांगल्य सेवा संस्थेने हा वारसा पुढे सुरू ठेवला आहे. जगदंबा मातेचे महिषासुरशी युध्द अशी ही मिरवणूक असते. मिरवणूक पाहण्यासाठी साधारण ५ हजारहून अधिक भाविक सहभागी होतात, अशी माहिती देण्यात आली.








