Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पाटील महाविद्यालयात जागतिक महिला दिवस साजरा

team by team
March 9, 2023
in Uncategorized
0
पाटील महाविद्यालयात जागतिक महिला दिवस साजरा

नंदूरबार l प्रतिनिधी

 

महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे तसेच आरोग्य संदर्भातील काही अडचणी आल्यास दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा असे प्रतिपादन गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयात आयोजित महिला दिन या प्रसंगी आधार हॉस्पिटलचे संचालिका डॉ. अनिता ठाकरे यांनी केले.

 

 

जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी डॉ.अनिता ठाकरे व प्रा. वैशाली शेवाळे प्राचार्य औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय नंदुरबार हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत. महिला दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयातील युवती सभेचे उद्घाटनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी होते. डॉ. ठाकरे यांनी आपल्या संभाषणातून महिलांच्या मानसिक व शारीरिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. महिलांच्या जीवनातील वयानुसार विविध टप्प्यांवर उद्भवणाऱ्या आरोग्याच्या अडचणींमध्ये  कशी काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.  बालपण, किशोरवयीन अवस्था, मासिक पाळी सुरू झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर लैगिंक आयुष्य, गरोदर अवस्था,  बाळंतपण या महत्त्वाच्या अवस्थेमध्ये महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी या संदर्भात महत्त्वाच्या सूचना  त्यांनी केल्यात. गर्भ अवस्था व बाळांतपण यामध्ये काय काय अडचणी येऊ शकतात व त्यावर काय उपाययोजना करायला पाहिजेत या संदर्भातही त्यांनी  सखोल मार्गदर्शन केले.

 

 

 

 

प्रा. वैशाली शेवाळे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची विविध क्षेत्रातील भरारी अधोरेखित केली. तसेच महिलांना सन्मान प्राप्त करून देणाऱ्या पुरुषांबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.  मुलींनी महाविद्यालयीन जीवन जगत असताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे या संदर्भातही त्यांनी विवेचन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोपात प्रा डॉ महेंद्र रघुवंशी यांनी शैक्षणिक क्षेत्रात मुलांपेक्षा मुलींचा प्रगती आलेख चढता आहे असे नमूद केले तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी महाविद्यालयात काही अडचणी आल्यास थेट प्राचार्यांकडे निसंकोचपणे यावे किंवा महिला प्राध्यापिकांशी संपर्क साधावा असे आवाहन केले.

 

 

 

 

सामाजिक जीवनात महिलांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. महिला दिनी महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षकांचे गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एन जे सोमानी तसेच मराठी विभागाचे विभाग प्रमुख व ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. विजया पाटील मंचवर उपस्थित होते.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती सभेच्या समन्वयक प्रा. संगीता पिंपरे, सूत्रसंचालन प्रा. वैशाली जगताप, तर आभार रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा जयश्री नायिका यांनी मानलेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.  दिनेश देवरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ. उपेंद्र धगधगे, प्रा जितेंद्र पाटील व वरिष्ठ स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

चौपाळे येथे जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा

Next Post

बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली दर्जा मिळवुन स्वतंत्र ग्रामपंचायत करा

Next Post
बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली दर्जा मिळवुन स्वतंत्र ग्रामपंचायत करा

बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली दर्जा मिळवुन स्वतंत्र ग्रामपंचायत करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add