Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्तुत्य उपक्रम : जागतीक महिलादिनी कन्यारत्न झालेल्या मातेची मोफत प्रसूती: स्त्रीरोगतज्ञ डॉ.प्रशांत ठाकरे

team by team
March 6, 2023
in सामाजिक
0
स्तुत्य उपक्रम : जागतीक महिलादिनी कन्यारत्न झालेल्या मातेची मोफत प्रसूती:  स्त्रीरोगतज्ञ डॉ.प्रशांत ठाकरे

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील स्पर्श नर्सिंग होमच्या माध्यमातून वंध्यत्व निवारण करून आतापर्यंत सुमारे दीडशेहुन अधिक जोडप्यांना मातृ- पितृत्व होण्याचे सौख्य मिळवून देण्यास यश आले आहे.जिल्ह्यातील एकमेव वंध्यत्व केंद्र स्पर्श नर्सिंग होम येथे आहे.दरम्यान जागतिक महिला दिन ८ मार्चला सर्वत्र उत्साला साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून येत्या ८ मार्च २०२३ रोजी साजरा होणार्‍या जागतिक महिला दिनी स्पर्श नर्सिंग होममध्ये मुलींना जन्म देणार्‍या मातांची प्रसूती विनामूल्य करण्यात येणार आहे. या अनोख्या उपक्रमाने स्पर्श नर्सिंग होमतर्फे महिला दिनी कन्याजन्माचे स्वागत करण्यात येईल, अशी माहिती नंदुरबार येथील स्पर्श नर्सिंग होमचे संचालक स्त्रीरोगतज्ञ डॉ.प्रशांत ठाकरे व डॉ.प्रीती प्रशांत ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

 

जागतिक महिला दिन ८ मार्चला सर्वत्र उत्साला साजरा केला जातो. त्या दिवशी महिलांचा सन्मान दिन मानला जातो. त्यामुळे या दिवशी स्पर्श हॉस्पिटलमध्ये जन्माला येणार्‍या कन्येचे स्वागत करून त्या कन्यारत्नाचा जन्म मोफत केला जाईल, ८ मार्च महिला दिनानिमितत महिलांचा आदर करणे आमचे कर्तव्य आहे. महिलांना होणार्‍या प्रत्येक आजारासंदर्भात आम्ही आमच्या संपूर्ण सुविधा येथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. स्पर्श नर्सिंग होमच्या माध्यमातून आतापर्यंत वंध्यत्व निवारण करून सुमारे दीडशेहुन अधिक जोडप्यांना मातृ- पितृत्व होण्याचे सौख्य मिळवून देण्यास यश आले आहे.

 

 

 

गोरगरीब व गरजू रुग्णांची अल्पदरात सेवा करणे हे कार्य स्पर्श नर्सिंग होमचे कार्य यापुढेही असेच सुरू राहील. २०२३ या वर्षाच्या सुरुवातीलाच स्पर्श नर्सिंग होमने नवीन भव्य दिव्य वास्तुत पदार्पण केले आहे. अशी माहिती शहरातील स्पर्श हॉस्पिटलचे स्त्रीरोगतज्ञ डॉ.प्रशांत ठाकरे यांनी सांगीतले.

 

 

यावेळी डॉ.प्रिती ठाकरे म्हणाले की, महिला प्रेग्नेन्सीच्या काळात चिडचिडेपणा करत असतात. त्या मेटली डिस्टर्ब होत असतात. गर्भावस्थेत महिलांच्या स्वभावात निरनिराळे बदल घडून येतात. सतत राग येणे, चिडचिड होणे ही लक्ष्णे आहेत. काही प्रमाणात चिंताग्रस्त होणे ठीक आहे. पण पहिल्यांदाच गर्भवती राहणार्‍या महिला अत्यंत तणावाखाली असतात. मानसिक ताणामुळे रक्तदाब वाढू शकतो. आणि नाडीचे ठोके वाढतात. त्याचा बाळाच्या आरोग्यणवर परिणाम होतो. गर्भवती महिलांमध्ये बर्‍याचदा गर्भारपण आणि बळांतपणाबद्दल मनात भिती असते. बाळंतपणाच्या या काळातून जाताना येणार्‍या अनुभवांमुळे ताण आणि चिंता वाढटणे स्वाभविक आहे. एखाद्या गर्भवती महिलेला प्रमाणापेक्षा अधिक ताणतणाव, नैराश्य व बेचैनी जाणवत असेल, तर हे चिंतेचे कारण आहे. त्यामुळे मानसिक विकार हे एखाद्या व्यक्त्ीच्या आकलनपशक्ती, भावनिक नियमन किंवा वागणुकीत वैद्यकीयदृष्या महत्वपूर्ण अशांतीद्वारे दर्शविले जाते. मानसिक विकारांचे अनेक प्रकार आहेत. त्यावरदेखील आम्ही उपचार करणार आहोत असे ही त्यांनी सांगितले.

 

 

कोरोना काळात देखील स्पर्श हॉस्पिटलचे स्त्रीरोगतज्ञ डॉ.प्रशांत ठाकरे यांनी कोरोना रुग्ण मातांची प्रसूती केली होती. व गर्भवती मातांना लासिकरणासाठी विशेष प्रयत्न केले होते.त्यांनी २०१६ साली एका महिलेवर यशस्वी जटिल शस्त्रक्रिया केली होती.त्यातून ४ बाळांचा सुखरुप जन्म झाला होता.आपल्या योग्य अपचार पद्धती मुळे स्पर्श हॉस्पिटलचे स्त्रीरोगतज्ञ डॉ.प्रशांत ठाकरे
अल्पावधीतच लोकप्रियता मिळविली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अरे बापरे : गारांनी झोडपले,तुफानी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत

Next Post

वीज पडून चार गुरांचा मृत्यू, नंदूरबार तालुक्यातील पूर्व भागात गारपिटीने झोडपले

Next Post
वीज पडून चार गुरांचा मृत्यू, नंदूरबार तालुक्यातील पूर्व भागात गारपिटीने झोडपले

वीज पडून चार गुरांचा मृत्यू, नंदूरबार तालुक्यातील पूर्व भागात गारपिटीने झोडपले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

January 25, 2026
श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

January 25, 2026
रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

January 25, 2026
राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

January 25, 2026
चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

January 25, 2026
नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

January 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add