नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा आगाराची शहादा- धडगाव बस दुचाकी ला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्यालगतचा नाल्यात उतरली. यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समोर आली असून काल दुपारी काकरदा (ता. धडगाव)गावानजीक देवबारी घाटात वळण रस्त्यावर हा अपघात घडला.
राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातील शहादा आगाराची धडगाव ते शहादा बस क्रमांक (एम. एच.२० बी. एल.३५१६) दुपारच्या सुमारास चालक ए. के. रावताळे धडगाव येथून प्रवाशांना घेऊन शहादा कडे येत असताना काकरदा गावानजीक देवबारी घाटात वळण रस्त्यावर समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारास वाचवताना रस्त्यालगत असलेल्या नाल्याचा कडेला उतरली.
सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान रस्त्यावरून येजा करणाऱ्या वाहनधारकांनी वाहन थांबवत प्रवाशांना बसमधून बाहेर काढले अपघात झालेला भाग दुर्गम असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते घटनेची माहिती मिळतात पोलीस प्रशासन व राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व मदत कार्यास सुरुवात केली.