म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सुलतानपूर हे गावं नंदुरबार जिल्ह्यात वसलेले आहे या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे शहादा शहराच्या उत्तरेस १५ कि.मी. अंतरावर असलेलं हे गावं आहे.
अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली एक विहीर व पुरातन किल्ला असल्याचे पुरावे व अवशेष आज ही आपणास पाहाव्यास मिळतात.सुलतानपूर येथे नागेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा करण्यात आला. सुलतानपूर हे ऐतिहासिक गावं आहे गावात अनेक पुरातन मंदिर. वास्तू आहेत त्यातीलच एक नागेश्वर महादेव मंदिर.गावात देव मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच भंडारा देखील देण्यात आला. सुलतानपूर. सुलवाडा. ब्राह्मणपुरी रायखेड. गावातील भक्तांनी भंडाऱ्याचा लाभ घेतला.








