नंदूरबार l प्रतिनिधी
राज्याच्या आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते तालुक्यातील सहा ठिकाणी जल जीवन मिशनचा अंतर्गत पाणीपुरवठा योजनांचा भूमिपूजन झाले


नंदुरबार तालुक्यातील उमर्दे, वेळावद, लोय, पिंपळोद, बर्डीपाडा, कोठली, धानोरा, ववस्त्या, गावाचा पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते संपन्न झाले, पश्चिम पट्ट्यातील टंचाईग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी. रंका नाला धरणावरून पाण्याचे स्तोत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. धानोरा, वेडावद, लोय पिंपळोद , बर्डीपाडा ,कोठली, या गावातील पाणी पुरवठा योजने पूर्ण होणार असल्याने या गावातील पाणीटंचाई कायमस्वरूपी मिटणार आहे.

या कार्यक्रमाच्या भूमिपूजन प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, खा.हिना गावित यांच्यासह पदाधिकारी आणि सरपंच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी सांगितले की, या गावातील पिण्याच्या पाण्याचे समस्या कायमस्वरूपी मिटवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम करण्यात येत आहेत. ठेकेदार यांनी वेळेत काम पूर्ण करून नागरिकांना शुद्ध पेयजल, उपलब्ध करून द्यावे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार निधीची कमतरता पडू देणार नाही अशी आश्वासन डॉ. सुप्रिया गावीत यांनी दिले.

या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित,, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, संसद रत्न खा. हिना गावित, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, माजी आमदार शरद गावित, माजी पंचायत समिती अध्यक्ष प्रकाश गावित, जिल्हा परिषद सदस्य राजश्री गावित, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य मालती गावित, एमजीपी चे श्री.निकम यावेळी उपस्थित होते.