नंदूरबार l प्रतिनिधी
जागतिक कर्णबधिरता दिन सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांताराव सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कपिल दुसेजा यांनी केले जागतिक कर्णबधिर दिन व सप्ताह निमित्तजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मनोगत व्यक्त केले. ऑडिओ- लॉजिस्ट कल्पेश चौधरी यांनी कानाची काळजी व निगा कशी घ्यायची व आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये राष्ट्रीय कर्णबधिरता व प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मिळणार्या सुविधा आहेत. त्याची गरज रुग्णांनी सेवेचा फायदा घ्यावा या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागामध्ये लोकांना याचा फायदा कशाप्रकारे करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.
तसेच या सप्ताह निमित्ताने जिल्यात कार्यशाळा, विविध स्पर्धा, प्रभातफेरी, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जनजागृती पर मार्गदर्शन कार्यक्रमातचे आयोजन करण्यात आले आहे . तसेच ८ मार्च २०२३ रोजी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे मोफत कान नाक घसा तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात गरजू रुग्णांना मोफत श्रवण तपासणी करण्यात येईल. तसेच दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येईल तरी गरजू रुग्णांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा अशी आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऋषिकेश पतंगे व मोसिन खान, मनोज चौधरी यांनी प्रयत्न केले.