Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठ्ठी बातमी : महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ठोठावली 3 वर्षाची शिक्षा

team by team
March 3, 2023
in क्राईम
0
ब्रेकिंग न्यूज : बॅटरीचा स्फोट झाल्याने ट्रक पेटून चालक जागीच ठार

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार येथील महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 3 वर्ष सश्रम कारावास व 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन नंदुरबार शहर पोलीस भा.द.वि. कलम 354 (अ), 509 प्रमाणे दि. 10 नोव्हेंबर 2019 रोजी आरोपीताविरुद् गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा महिलांविषयक गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपी चंद्रशेखर मुरलीधर भस्मे रा. नुतन हायस्कुल समोर, नंदुरबार यास दिनांक 11 नोव्हेंबर 2019 रोजी तात्काळ अटक करण्यात आली होती.

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक प्रियदर्शनी थोरात यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी चंद्रशेखर मुरलीधर भस्मे याच्या विरुद्ध दोषारोपपत्र मुख्य न्यायदंडाधिकारी, नंदुरबार यांचे न्यायालयात सादर केले होते.

मुख्य न्यायदंडाधिकारी, नंदुरबार विनोद चव्हाण यांनी साक्षीदारांचे जबाब, पंच, आणि परिस्थितीजन्य पुरावे तपास अधिकारी यांची साक्ष, सरकारी पक्षाचा युक्तीवाद यासर्व बाबींचा विचार करुन आरोपी चंद्रशेखर मुरलीधर भस्मे रा. नुतन हायस्कुल समोर, नंदुरबार यास 3 वर्ष सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक प्रियदर्शनी थोरात यांनी केला असून न्यायालयात खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. सुनिल पाडवी यांनी पाहिले होते. पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस उप निरीक्षक राहुल भदाणे, पोलीस हवालदार गणेश धनगर, मनोज साळुंखे, पोलीस नाईक गिरीश पाटील यांनी कामकाज केले आहे.

तपास अधिकारी व त्यांच्या पथक तसेच विशेष सरकारी वकील यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता

Next Post

जिल्हा परिषदेचा २८ कोटी ९८ लाखाचा शिल्लकी अर्थसंकल्प, वित्त समिती सभापती गणेश पराडकेंनी सादर केले अंदाजपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add