Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा परिषदेचा २८ कोटी ९८ लाखाचा शिल्लकी अर्थसंकल्प, वित्त समिती सभापती गणेश पराडकेंनी सादर केले अंदाजपत्र

team by team
March 4, 2023
in Uncategorized
0
जिल्हा परिषदेचा २८ कोटी ९८ लाखाचा शिल्लकी अर्थसंकल्प, वित्त समिती सभापती गणेश पराडकेंनी सादर केले अंदाजपत्र
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथील जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सन २०२२-२३ या वर्षाचा सुधारीत व सन २०२३-२४ मुळ अर्थसंकल्प सादर झाला असून महसूल व भांडवली अशी एकूण ७० कोटी ६६ लाख १७ हजार ७७९ रुपयांचे अंदाज पत्रक सादर करण्यात आले. यातील सन २०२३-२४ मध्ये संभाव्य खर्च वजा जाता २८ कोटी ९८ लाख २७ हजार ३७४ रुपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प वित्त समिती सभापती गणेश पराडके यांनी सादर करीत ग्रामीण क्षेत्राच्या समतोल विकासाकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
नंदूरबार येथील जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात सन २०२२-२३ या वर्षाचा सुधारीत व  सन २०२३-२४ या वर्षाचा मुळ अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्यासह वित्त समिती सभापती गणेश पराडके तसेच सभापती संगिता गावित, हेमलता शितोळे, शंकर पाडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील उपस्थित होते.
यावेळी सन २०२२-२३ या वर्षाचा सुधारीत सन २०२३-२४ या वर्षाचा मुळ अर्थसंकल्प सादर करतांना वित्त समिती सभापती गणेश पराडके म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या अनुदानात स्थानिक उपकर, वाढीव उपकर, स्थानिक उपकर सापेक्ष अनुदान, मुद्रांक क्षुल्क आदींचा समावेश होतो. तो विचारात घेऊन जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या स्वउत्पन्नाची जमा रक्कम विचारात घेऊन ग्रामीण क्षेत्राच्या समतोल विकासाकरीता निधी उपलब्ध करुन देणारे अंदाज पत्रक सादर करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील समस्या व जिल्हा परिषदेस प्राप्त होणारे मर्यादीत उत्पन्न याचा मेळ घालून ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तरतूदी उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचे श्री.पराडके म्हणाले. तसेच पंचायत समिती वाढीव उपकर अनुदान, घसारा निधी व ग्रामीण पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्ती निधी जमा व खर्चाचे सुधारीत मुळ अंदाज पत्रक याप्रसंगी सादर करण्यात आले.
नियमबाह्य सभा होत असल्याचा आरोप करत विरोधकांचे निवेदन
दि.३ मार्च रोजी झालेल्या जि.प.ची सर्वसाधारण सभा नियमबाह्य होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. सदरच्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वसाधारण सभा घेणे आयत्या वेळेचा विषय होवू शकत नाही. सदरची बाब नियमास धरुन नाही. दि.२ मार्च रोजी सायंकाळी मोबाईलच्या व्हॉटस ॲपवर सभेची सुचना प्राप्त झाली. खरे तर सात दिवस आधी याबाबत कळविणे अपेक्षित असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच अजेंड्यावरील विषय क्रमांक ४,५,६,७ व ८ हे सभेच्या नियमास धरुन नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर सभागृह विरोधी पक्षनेते रतन पाडवी, गटनेते सी.के.पाडवी तसेच जि.प.सदस्य मधुकर नाईक, राया मावची, जितेंद्र पाडवी, प्रताप वसावे, देवमन पवार, जान्या पाडवी, ॲड.सीमा वळवी, निर्मला राऊत आदींच्या सह्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

मोठ्ठी बातमी : महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ठोठावली 3 वर्षाची शिक्षा

Next Post

इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही – राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

Next Post
लोणखेडा केंद्रावर बारावीच्या परीक्षेस आजपासून सुरुवात

इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही – राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add