नंदुरबार l प्रतिनिधी
महागाईमुळे त्रस्त लोकांच्या त्रासात आणखी भर पडली आहे. बुधवारपासून घरगुती सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांची दरवाढ झाली आहे. तर व्यवसायिक सिलिंडरच्या किंमतीत ३५० रुपयांनी वाढ झाली आहे. ईशान्यकडील तीन राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लगेच किंमती वाढविल्या आहेत. या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे येथील सुभाष चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
दरवेळी नवनवीन गाजर देत सर्वसामान्य जनता व व्यवसायिकांचे कंबरडे मोडणारे भाजपचे केंद्र सरकार फक्त देश विक्रीकडे नेत असल्याचा भावना यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या आदेशाने तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राऊ मोरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मोहन रायभान माळी, माजी शहराध्यक्ष नितीन जगताप, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, ओबीसी सेल समन्वयक निलेश चौधरी, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष लल्ला मराठे, व्हीजीएनटी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद जाधव, राजा ठाकरे, सुनील राजपूत, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष जयंत मोरे, युवक कार्याध्यक्ष कालु पहेलवान, उपाध्यक्ष लाला बागवान, अमोल पाडवी, राजु शिंदे, अर्जुन राठोड यांच्यासह राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.