Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विषेश कामगीरी करणार्‍या जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांचा विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते सन्मान

team by team
March 3, 2023
in क्राईम
0
विषेश कामगीरी करणार्‍या जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांचा विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते सन्मान

नंदुरबार |  प्रतिनिधी

 

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील हे दोन दिवस नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले आहेत.आज पोलीस अधीक्षक कार्यालयातील संवाद हॉल येथे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा प्रभारी अधिकारी यांचे करीता गुन्हे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.जानेवारी २०२२ ते डिसेंबर- २०२२ या कालावधीत समन्स वॉरंट बजावणी, खावटी वॉरंट बजावणी, सी. सी. टी. एन. एस.कामकाज, मुद्देमाल निर्गती तसेच वर्षभराच्या काळात नंदुरबार जिल्हा घटकात दाखल मंदीर चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपीतांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणार्‍या पोलीस तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांचा प्रमाणपत्र तसेच पुष्पगुच्छ देवून याप्रसंगी डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

शहादा येथील सुघोषाघंट मंदीर एवंम जैन मंदीर दादावाडी व दंडपाणेश्वर गणपती मंदीर येथील मंदीर चोरीबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व त्यांच्या पथकाचा तसेच देवमोगरा माता मंदीर बर्डीपाडा, विसरवाडी येथील मंदीर चोरीबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या पथकाचा सत्कार करण्यात आला. तसेच सन २०२२ मध्ये उत्कृष्ट समन्स बजावणीसाठी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, उत्कृष्ट नॉन बेलेबल वॉरंटच्या बजावणीसाठी म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, खावटी वारंटच्या उत्कृष्ट बजावणीसाठी व सी. सी. टी. एन. एस. च्या फॉर्म फिडींगसाठी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडीत सोनवणे तसेच वर्ष भरातील काळात मुद्देमालाची उत्कृष्ट निर्गती केल्याबद्दल नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस  निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या सहकार्‍यांच्या या प्रसंगी सत्कार करण्यात आला.

 

 

 

गुन्हे आढावा बैठकी दरम्यान डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी मागील दोन वर्षाच्या कालावधीतील गुन्ह्यांच्या विविध प्रकारात झालेली वाढ, घट, गुन्हे शाबितीचे प्रमाण, अवैध धंद्यांविरुध्द कारवाई, मुद्देमाल निर्गती, मालमत्तेविरुध्दचे ना उघड गुन्हे, प्रतिबंधक कारवाई तसेच प्रशासकीय बाबींचा आढावा घेतला. सराईत गुन्हेगारांविरुध्द् कठोर कारवाई करण्याबरोबरच सामान्य जनतेशी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सौजन्य राखावे असे ही त्यांनी सांगितले. तसेच टोळ्यांमध्ये काम करणार्‍या गुन्हेगारांचे गँग हिस्ट्रीशिट उघडून गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणेबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

 

 

 

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या गुन्हे प्रकटीकरण, गुन्हे निर्गती, मुद्देमाल निर्गती, समन्स वॉरंट बजावणी व सी. सी. टी. एन. एस. पोर्टलच्या कामकाजाबाबत तसेच जिल्हा पोलीस दलाच्या एकंदरीत कामकाजाबाबत बी.जी. शेखर पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, शहादा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस उप अधीक्षक विश्वास वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे निषेध

Next Post

जिल्हा पोलीस दलाच्या वैद्यकीय शिबीराचे उद्घाटन

Next Post
जिल्हा पोलीस दलाच्या वैद्यकीय शिबीराचे उद्घाटन

जिल्हा पोलीस दलाच्या वैद्यकीय शिबीराचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add