म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथे १ मार्च रोजी थोर समाजसुधारक व थोर निरूपणकार महाराष्ट्रभुषण आदरणीय डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्माला शंभर वर्ष पुर्ण होत असुन त्यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त डॉ .श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड यांचे संस्थापक अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादुत पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने शहादा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानाचे उद्घाटन नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक राजेंद्र चव्हाण, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक भूषण सोनार यांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानात प्रतिष्ठानचे ९५ श्रीसदस्य सहभागी झाले.असुन त्यात ३कि.मी.चे दुतर्फा रस्ते स्वच्छ केले व ३ टन सुका कचरा संकलन करण्यात आले. हा कचरा ३ ट्रॅक्टरच्या साहाय्याने शहराच्या बाहेर डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात आला.
डॉ.श्री .नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे एक सेवादायी समाजभिमुख उपक्रम राबविणारे प्रतिष्ठान आहे.आत्ता पर्यंत जिल्ह्यात वृक्ष लागवड व संवर्धन, स्मशानभूमी व कब्रस्थान स्वच्छता, रक्तदान शिबिर, विहीर व बोरवेल जलपूनर्भरण, प्रौढसाक्षरता वर्ग व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप या सारखे विविध समाजहिताचे उपक्रम राबविण्यात आले आहेत.