Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सातपुड्यात होळी उत्सवाला आज पासून प्रारंभ

team by team
March 2, 2023
in सामाजिक
0
सातपुड्यात होळी उत्सवाला आज पासून प्रारंभ

नंदुरबार l प्रतिनिधी

 

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतांच्या रांगामध्ये असलेले आदिवासी बांधव हे होळी सण आदिम संस्कृतिक सण होळी म्हणजे आदिवासीच्या कुलदेवता पैकी एक आदिम देवता समजली जाते. म्हणून आदिवासी सातपुडा परिसरात होळी सणाला खूप महत्व दिले जाते. एक महिना पासून माघ पौर्णिमेच्या या परिसरातील होळीची तयारी सुरु होते.

 

 

होळीच्या नवस करणारे मोरखी, यांच्याकडून एक महिना किंवा दोन, तीन महिने नियमांचे पालन करावे लागते. या सातपुडा परिसरातील आदिवासी बांधव आपल्या कुटूंबासह आणि गावाच्या कल्याण होवो, रोगराई, नेसर्गिक संकटातून मुक्त व्हावे म्हणून आपल्या कुलदेवताला नवस करत असतात. त्यामुळे यालाच आदिवासी भाषेत ( मानता ) असे म्हणतात. ही मानता पाळण्यासाठी कुटूंबातील पुरुष व्यक्ती गाव पुजारी यांचे सांगण्यावरून मोरखी, बावा, बुध्या, नागरामोरखी, धाणका डोको, अशी वेगवेगळे रूपे घेऊन या होळी सणाला आपला नवस फेडत असतात.

 

 

 

गावातील कारागीर कडक नियमांचे पालन करून ( पालनी ) करून घराबाहेर राहून गुरे, ढोरे, घरातील व्यक्ती, धान्य यांचे निघा राखावी म्हणून कडक नियमांचे पालन करत असतात. गेल्या काही ३० वर्षांपासून मोरांच्या पिसापासून टोपी बनवणे हे सुरु असते. म्हणूनच आदिवासी परिसरातील होळी मध्ये पारंपारिक ढोल,ताशे,वाद्य पावी, रूढी,परंपरा, रितिरिवाजा प्रमाणे साजरा केली जात असते. यावेळी होळी सण दि.२ मार्च मानाची होळी मोरीराही येथील होळी पेटवून होळ सणाला सुरुवात होणार याचदिवशी पिपंलाबारी येथील होळी सुद्धा होईल.३ मार्चला तोडीकुंड, पाडली, काकारपाटी अस्तंबा,४ मार्चला मेवडी, पाडली,( लहान ) रामसाला, गोवऱ्या, ५ मार्चला कालिबेल, उर्मिलामाळ,अस्तंबा,६ मार्च काठी ( राजवाडी ) होळी, गादवाणी, सुरवाणी,७ मार्चला मोलगी, तलाई, खर्डा,८ मार्चला असली, जामली,९ मार्चला जमाना, वरखेडी, धनाजे,१० मार्चला शेवटची होळी म्हणजे बुगवाडा होळी आणि होळी उत्सवाला समारोप होईल.

 

 

 

गुजरात, बारडोली, नवसारी, सुरत, पालेज, भरूच,अंक्लेशवर नाशिक, पंढरपूर,पुणे,आणि इतर ठिकाणी कामासाठी रोजगारासाठी स्थलांतरीत झालेली कुटुंब मार्च महिन्यात होळी पाहण्यासाठी गावात येत असतात. मोरखी म्हणजे डोक्यावर मोराचे पिसाचे मुकुट आणि कंबरेला घुंगरू बांधलेले असते. तर बावा, बुद्या म्हणजे जे डोक्यावर बांबू पासून टोपीला रंगीबेरंगी कागदाच्या तुकडे चिकटून टोपीला डोक्यवर घालतात. आणि कंमरेला भोपळा, दुदी डोवे, बांधलेले असते. याशिवाय नागरामोरखी, धाणका डोको,इत्यादी पेहेराव करून नाचणारे व्यक्ती असतात. ही मानता करणारी लोक होळीच्या महिन्याच्या सुरुवातीलाच काही नियम पाळणे गरजेचे असते.

 

 

 

त्यामुळे त्यांना घराबाहेर राहावे लागते. खाटेवर न बसणे, झोपणे, स्रियांना स्पर्श न करणे, पायात चप्पल न घालणे, या सारख्या अनेक नियमे पालन करावे लागते. गावातील होळी भोवती रात्रभर ढोल, ताचे,वाजत नाचतात. गीत गात ढोल ताचे वाजत नाचतात. शेवटच्या दिवशी गावातील लोकांची होळीत सर्व मोरखीसह व ग्रामस्थांच्या वतीने पोलीस पाटील, गावातील लोक रात्रभर नाचतात. होळीच्या गीत गायले जाते. पहाटे५,६ वाजता होळीची पूजा करून पेटवली जाते.

 

 

गावातील पोलीस पाटील यांच्या घरी बैठक घेऊन पूर्ण गावात मोरखी फिरतात आणि तेथून गावातील नदीच्या ठिकाणी सर्व मोरखी सह विविध पाडातील लोक एकत्र येऊन आंघोळ करून हे वृत( पालनी ) संपते होळी म्हणजे सर्व आदिवासी समाजातील गावांमध्ये आनंदाला उधाण आलेलं असते.

आदिवासी मुली आणि स्त्रीया पारंपारिक चांदीचे दागिने अंगावर घालत असतात. आणि आनंदाने रात्री होळी गीत गात असतात.

केहेदेख आली वा ओली बाय, मोकसो वाटे देख आली वा ओली बाय, डोगु देख आली वा ओली बाय परदेसुमे,
ओली बाय झलकेवा ओलीबाय ओलीबाय नाकुमे सोना मोत्यावा ओली बाय म्हणजे होळी या देवतेचे रूप धारण करून हळूहळू झळकते आहे. तिने नाकात सोन्या मोत्याचे नथणी तर गळ्यात चांदीची हार घातला असतो. अशा प्रकारे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा परिसरात होळी सण हा मोठ्या संख्येने उत्साहात साजरा केला जात असतो.

बातमी शेअर करा
Previous Post

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली हजार विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी शपथ

Next Post

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त शहादा येथे स्वच्छता अभियान

Next Post
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त शहादा येथे स्वच्छता अभियान

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त शहादा येथे स्वच्छता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add