नवापूर l प्रतिनिधी
मोगराणी ( ता. नवापूर ) या गावातील दोन घरांना २७ फेब्रुवारी ला दुपारी शॉर्ट सर्किट झाल्याने गॅस सिलेंडरचा स्फोट होवून आग लागली. या आगीत दोन्ही घरं संपूर्ण जळून खाक झाली. या दोन घरातील तीन कुटुंब बेघर झाली. तलाठी विकी गागुर्डे यांनी पंचनामा केला. दोन्ही घरांचे २ लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आज जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनीताई नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. तिन्ही कुटुंबाचे सांत्वन करून मदत केली.
२७ फेब्रुवारी २०२३ रोजी गावात दुपारी ४:३० मोगराणी गावातील ग्रामस्थ विकास सुपडीया पाडवी, लालसिंग अर्जुन वळवी, रोहिदास लक्ष्मन वळवी यांच्या मालकीच्या दोन घरांना २७ फेब्रुवारीला दुपारी साडेचार च्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने गॅस सिलेंडरचा स्फोट झाला यात घरांना आग लागली. या लागलेल्या आगीत दोन घरे जळून खाक झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. धान्यासह घरगुती सामानासह धान्य व इतर सर्व जिवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. गॅस चा स्फोट इतका भयंकर होता की अख्ख गाव हादरले, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
या दुर्घटनेची माहिती होताच आज पाहणी करण्यासाठी व संबंधित कुटुंबाना मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनीताई नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत दोन घरे जळून गेली आहेत, त्या कुटुंबातील लोकांचे सांत्वन केले. धान्य व पैशाची आर्थिक मदत केली. यावेळी पंचायत समिती सदस्य राजु कोकणी, मोगराणीचे सरपंच सुशिला कोकणी, माजी सरपंच पोसल्या कोकणी, ग्रा म सदस्य धनिल कोकणी, लक्ष्मण कोकणी, सामी गावीत, ढोगचे सरपंच देवा कोकणी, ग्राम पंचायत सदस्य सलीमा गावीत, माजी सरपंच देशुबाई कोकणी, कविदास कोकणी आदी उपस्थित होते. आमदार निधीतुन व शासनाकडुन जास्तीत जास्त मदत कशी होईल यासाठी प्रयत्न करेन असे आश्वसन दिले. यावेळी मोगराणी गावीत ग्रामस्थ मोठया संख्यने उपस्थित होते.