Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सिलेंडरचा स्फोट होवून दोन्ही घरं जळून खाक, मिळाला मदतीचा हात

team by team
March 1, 2023
in राजकीय
0
सिलेंडरचा स्फोट होवून दोन्ही घरं जळून खाक, मिळाला मदतीचा हात
नवापूर l प्रतिनिधी
  मोगराणी ( ता. नवापूर ) या गावातील दोन घरांना २७ फेब्रुवारी ला दुपारी शॉर्ट सर्किट झाल्याने गॅस सिलेंडरचा स्फोट होवून आग लागली. या आगीत दोन्ही घरं संपूर्ण जळून खाक झाली. या दोन घरातील तीन कुटुंब बेघर झाली. तलाठी विकी गागुर्डे यांनी पंचनामा केला. दोन्ही घरांचे २ लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आज जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनीताई नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. तिन्ही कुटुंबाचे सांत्वन करून मदत केली.
२७ फेब्रुवारी २०२३ रोजी गावात दुपारी ४:३० मोगराणी गावातील ग्रामस्थ विकास सुपडीया पाडवी, लालसिंग अर्जुन वळवी, रोहिदास लक्ष्मन वळवी यांच्या मालकीच्या दोन घरांना २७ फेब्रुवारीला दुपारी साडेचार च्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने गॅस सिलेंडरचा स्फोट झाला यात घरांना आग लागली. या लागलेल्या आगीत दोन घरे जळून खाक झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. धान्यासह घरगुती सामानासह धान्य व इतर सर्व जिवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. गॅस चा स्फोट इतका भयंकर होता की अख्ख गाव हादरले, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
या दुर्घटनेची माहिती होताच आज पाहणी करण्यासाठी व संबंधित कुटुंबाना मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनीताई नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत दोन घरे जळून गेली आहेत, त्या कुटुंबातील लोकांचे सांत्वन केले. धान्य व पैशाची आर्थिक मदत केली.  यावेळी पंचायत समिती सदस्य राजु कोकणी, मोगराणीचे सरपंच सुशिला कोकणी, माजी सरपंच पोसल्या कोकणी, ग्रा म सदस्य धनिल कोकणी, लक्ष्मण कोकणी, सामी गावीत, ढोगचे सरपंच देवा कोकणी, ग्राम पंचायत सदस्य सलीमा गावीत,  माजी सरपंच देशुबाई कोकणी, कविदास कोकणी आदी उपस्थित होते.  आमदार निधीतुन व शासनाकडुन जास्तीत जास्त मदत कशी होईल यासाठी प्रयत्न करेन असे आश्वसन दिले. यावेळी मोगराणी गावीत ग्रामस्थ मोठया संख्यने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

संत गरिब दासजी महाराज बोध दिवसानिमित्त शहादा येथे भव्य शोभायात्रा

Next Post

रावळपाणी येथे आप समाजातर्फे आज श्रद्धांजलीचे आयोजन

Next Post
रावळपाणी येथे आप समाजातर्फे आज श्रद्धांजलीचे आयोजन

रावळपाणी येथे आप समाजातर्फे आज श्रद्धांजलीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add