Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोग्राणी येथे आगीत दोन घरे जळून खाक

team by team
February 28, 2023
in क्राईम
0
मोग्राणी येथे आगीत दोन घरे जळून खाक

नवापूर । प्रतिनिधी
यंदा कडाक्याच्या थंडीनंतर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस उन्हाचा तडाखा वाढताना दिसून येत आहे. गेल्या आठवड्याभरात धावत्या वाहनांना आग लागून जळण्याचे प्रकार समोर आले असतानाच.  दुपारी नवापूर तालुक्यातील मोग्राणी गावात दोन घरांना अचानक आग लागून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अधिक माहिती अशी कि, नवापूर तालुक्यातील मोग्राणी रहिवासी लक्ष्मण सामा वळवी व लालसिंग अर्जुन पाडवी यांची घरे एकत्र होती. सुरुवातीला एका घराला आग लागल्यानंतर उष्णता व हवेमुळे आगीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याने दोन्ही घरे जळून खाक झाली आहे. या आगीमध्ये घरातील धान्य, कपडे, घरगुती सामान व फर्निचर लाकडी दांड्या, खांबे सर्व जळून भस्म झाले आहे.
आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मिळेल त्या भांड्यात पाणी घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग एवढी भीषण होती की आग विझविणे कठीण झाले. धान्यासह कपडे व सर्व संसार उपयोगी वस्तू आगीमुळे जळून खाक झाल्याने दोन्ही परिवार उघड्यावर आले आहे. घरांना आग लागल्यानंतर नागरिकांनी बाहेर पडून आपला जीव वाचविला त्यामुळे जीवित हानी टळली आहे.
गावातील ज्येष्ठ नागरिकांनी नुकसानग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन सदर कुटुंबांना महसूल विभागाने पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अचानक लागलेल्या या आगीत घरातील सर्वसामान जळून खाक झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्यापही स्पष्ट झाले नाही.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शहर राष्ट्रवादीची कार्यकारीणी बरखास्त,जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी याबाबत सांगितले कारण

Next Post

वाळूची ट्रक सोडविण्यासाठी ७० हजाराची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी यांना नंदूरबार तहसील समोरून रंगेहाथ अटक

Next Post
गलेगठ्ठ पगार असताना लाचेची मागणी: ५०० रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी खाजगी पंटर सह आरटीओला रंगेहाथ अटक

वाळूची ट्रक सोडविण्यासाठी ७० हजाराची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी यांना नंदूरबार तहसील समोरून रंगेहाथ अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026
आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

August 11, 2026
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

August 11, 2026
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add