नंदूरबार l प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील पाटीलफळी येथील शेत शिवारातून चोरट्याने इलेक्ट्रिक मोटारसह पाईप व वायर असे सुमारे ४० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील पाटीलफळी येथील नितेश मनेश गावित यांचे गावालगत शेत आहे. सदर शेतात चोरट्याने प्रवेश करुन १५ हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक मोटार, ४ हजार रुपये किंमतीचे ४ लोखंडी पाईप, १० हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक वायर व १० हजार रुपये किंमतीचे ४३ प्लास्टीकचे पाईप असे एकूण ३९ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेले.
याबाबत नितेश गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गुमानसिंग पाडवी करीत आहेत.









