Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग योजनेतर्ंगत ५५ लाभार्थ्याचे खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते कर्ज वितरण

team by team
February 24, 2023
in राजकीय
0
पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग योजनेतर्ंगत ५५ लाभार्थ्याचे खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते कर्ज वितरण

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार येथे पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग योजनेतर्ंगत स्टेंट बँकेकडुन एकाच दिवशी ५५ लाभार्थ्याचे कर्ज प्रकरणे मंजुर करण्यात आले. कर्ज मजुरीचे आदेशाचे वाटप खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते कर्ज वितरण करण्यात आले.

 

 

नंदुरबार जिल्हयासाठी १५० वैयक्तिक लाभार्थ्याना उदयोग उभारणीचे लक्षांक देण्यात आलेले होते. या ५५ प्रकरणांसह जिल्हयाचे भौतिक व आर्थिक लक्षांक साध्य झाले आहे. भारतीय स्टेंट बँक ही जिल्हयाची अग्रणी बँक असल्याने सदर योजना समजुन घेण्यासाठी त्यांनी कृषि विभागांच्या अधिकान्यासोबत बँकेचे विभागीय तसेच राज्य अधिकान्या समवेत सभा आयोजित केलेली होती. त्यामध्ये पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग योजनेचे राज्यस्तरीय बँकींग तज्ञ सुनिल रामटेके यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली. सदर सभेमध्ये स्टेट बँकेच्या अधिकार्‍यांनी योजनेचे महत्व जाणून घेतले तसेच संपूर्ण जिल्हयात स्टेट बँकेकडे प्रलंबित असलेले सर्वच प्रस्ताव मंजुर करण्यात आले. यामध्ये तालुका नवापुर २२, शहादा १३, नंदुरबार १०, अक्कलकुवा ६, तळोदा २ व अक्राणी २ असे एकुण ५५ प्रस्ताव मंजुर करण्यात आले.

 

 

 

याप्रसंगी नंदुरबार जिल्हयामध्ये प्रक्रिया उदयोगासाठी खुप मोठा वाव असल्याने जास्तीत जास्त लोकांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन खा.डॉ. हिना गावित यांनी केले. याशिवाय उदयोग व्यवसाय यशस्वी व्हावे यासाठी लाभार्थ्याचा स्वहिस्सा केंद्र व राज्य शासनाकडुन अनुदान तसेच बँकेकडुन कर्ज अशी तिहेरी सांगड योजनेत घालून देण्यात आली आहे. यामुळे व्यवसाय बंद पडणे किंवा बँकेचे कर्ज बुडित होणे असे प्रकार कमीत कमी प्रमाणात होतात. सदयाचे युग हे आरोग्याबाबत जागरुकीचे असून सेंद्रीय मालास जगभरात फार मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. आणि नंदुरबार जिल्हा हा सेंद्रीय फळे व अन्नधान्य यांची बाजारपेठ आहे. त्यामुळे पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग योजनेतर्ंगत  सेंद्रीय पदार्थ तयार करुन त्यावर सेंद्रीय असल्याचा ब्रॅण्ड तयार करुन बाजारपेठा काबिज करावे. असे आवाहन ही खा.डॉ. हिना गावित यांनी केले. सदर ५५ उदयोग हे मिरची कांडप, दाल मिल, राईस मिल दुग्धव्यवसाय, आईल मिल, हळदी कांडप, शेवाळी व कुरडाया उदयोग, मसाले प्रक्रिया, केळी वेर्फस, पिठ तयार करुन पॅकींग करुन विकणे, गुळ गुर्‍हाळ इ. व्यवसायासाठी कर्ज मंजुरी करण्यात आली.

 

 

 

नंदुरबार जिल्हयातील जमीन व हवामान यातील विविधता पाहता केळी, पपई, मिरची, कांदा, तादुळ, विविध प्रकारच्या दाळी, तसेच भगर, राई, नागली, नाचणी, राळा, कोद्रा इ. पिकांसाठी प्रक्रिया उदयोगांस फार मोठया प्रमाणात वाव असल्याने जास्तीत जास्त लोकांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विभागातील नोडल ऑफिसर विजय मोहित यांनी केले.याप्रसंगी भारतीय सिमाचे संरक्षण करणार्‍या शहिद झालेल्या जवानांच्या कुंटुबियांना भारतीय स्टेट बँकेकडुन ५० लाख सानुग्रह अनुदान धनादेश वितरीत करण्यात आला. शहीद मनोज लक्ष्मणराव गायकवाड या शहीद जवानांच्या पत्नी रुपाली मनोज गायकवाड यांना धनादेश सुपूर्त करण्यात आला.तसेच सुरजित कुमार शहा क्षेत्रिय प्रबर्धक, धुळे अजय वाल्हे, मुख्य प्रबर्धक, धुळे विनोद राऊत, मुख्य प्रबर्धक, नंदुरबार राजेश मिश्रा, मुख्य प्रबर्धक, नंदुरबार, तसेच कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा संसाधन व्यक्ती आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

गंगापूर शिवारात धावत्या ट्रकला भिषण आग

Next Post

जागेच्या वादातुन चौघांना मारहाण, १३ जणांविरूध्द गुन्हा

Next Post
आमलीबारी गावाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू

जागेच्या वादातुन चौघांना मारहाण, १३ जणांविरूध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add