तळोदा l प्रतिनिधी
आमदार राजेश पाडवी ओपन मॅरेथॉन स्पर्धेत उत्तर प्रदेश येथील धावपटूंनी बाजू मारली. प्रथम येणाऱ्या स्पर्धकाने अवघ्या २६ मिनिटात १० किमीचे अंतर गाठले. व विजय संपादन केला.
स्पर्धेत आलेल्या तरुणाचा उत्साह पाहून दि. ८ मार्च रोजी महिलांची देखील मॅरेथॉन स्पर्धा भरविण्याचा संकल्प आमदार पाडवी यांनी केला.शहरातील गोऱ्या हनुमान ग्रुपतर्फे राजेश दादा पाडवी ओपन मॅरेथॉन २०२३ या स्पर्धा घेतली. या स्पर्धेत ४०० धावपटू संत गुलाम महाराज प्रवेशद्वार येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.


या स्पर्धेत उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, व महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. उत्तर प्रदेश येथील विशाल उमेश यादव याने २६.११ मिनिटात १० किमीचे अंतर गाठत प्रथम क्रमांक मिळवला आहे. द्वितीय मोहित सुहाल, उत्तर प्रदेश तृतीय बहादुरसिंग हरीयाणा पटकविला. चतुर्थ अजयकुमार बिंद युपी, पाचवा संजयकुमार बालियान उत्तर प्रदेश वखारे, अजय देशमूख नाशिक, चव्हाण राहुल वसावे इनिस गुजरात, वसावे दिनेश, उदयसिंग पाडवी धडगाव, भगतसिंग राहसे असली विजयी स्पर्धकांना राजेश पाडवी, ओपन मॅरेथॉन स्पर्धेत विजयी झाले.
माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, राजेंद्र गावित, तहसीलदार गिरीश वखारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, गटशिक्षण अधिकारी शेखर धनगर पो. नि पंडितराव सोनवणे, योगेश चौधरी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, हेमलाल मगरे, श्याम राजपूत, बळीराम पाडवी, अशोकतांबोळी, अमोन्नोद्दीन शेख, कैलास चौधरी, शिरीष माळी, प्रदीप शेंडे यांच्या हस्ते रोख रक्कम देण्यात आली. यावेळी प्राचार्य अजित टवाळे, क्रीडा शिक्षक सुनील सूर्यवंशी प्रा प्रसाद भोगे, सुनिल मगरे. जितेंद्र माळी. राजेश सागर फुंदिलाल माळी. विशाल राजपूत उपस्थित होते. सूत्रसंचालन अक्षय कलाल यांनी केले.