नंदुरबार
काहीतरी आजाराने बेशुध्द अवस्थेतील एका अनोळखीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या मयत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन शहादा पोलिस ठाण्याकडून करण्यात आले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहादा ग्रामीण रुग्णालयात एक अनोळखी इसम अंदाजे वय 25 ते 30 वर्षीय वयोगटाचा यास बेशुध्द अवस्थेत दाखल करण्यात आले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेने शहादा येथून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
याठिकाणी उपचारादरम्यान या अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत जिल्हा रुग्णालयातील कक्षसेवक जितेंद्र गंगाराम गवळी यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी शहादा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या मयताची ओळख पटविण्याचे आवाहन शहादा पोलिस ठाण्याकडून करण्यात आले आहे.