नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 14 व 18 मध्ये आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या आमदार निधी व नगरविकास निधीतून विविध विकास कामांचा भुमिपूजन सोहळा आज दि.18 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांनी आपल्या आमदार निधी व नगरविकास निधीतून नंदुरबार शहरातील प्रभाग क्रमांक 14 व 18 मध्ये सुमारे 5 कोटी 40 लाख रुपयांच्या निधीतून विविध विकास कामे करण्यात येणार आहे. या कामांचा भुमिपूजन सोहळा आज दि.18 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित केला आहे. प्रभाग क्रमांक 18 मध्ये सायंकाळी 5 वाजता तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये सायंकाळी 6 वाजता विविध विकास कामांचे भुमिपूजन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते होईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.डॉ.हिना गावित, नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित असतील. प्रमुख पाहुणे म्हणुन भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, माजी आ.शिरीष चौधरी, हिरा उद्योग समुहाचे चेअरमन प्रा.डॉ.रविंद्र चौधरी, ज्येष्ठ नेते पुखराजकाका जैन, भाजपाचे युवा नेते डॉ.विक्रांत मोरे, भाजपाचे पालिकेतील माजी विरोधी पक्षनेता अॅड.चारुदत्त कळवणकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष किसन माळी, समर्थ प्लॉट विक्री केंद्राचे संचालक अविनाश माळी, जिल्हा सचिव रघुनाथ माळी, माजी शहराध्यक्ष माणिक माळी, माजी नगरसेवक प्रविण गुरव, माजी नगरसेविका संगिताबाई सोनवणे, आरोग्यसेवक संतोष वसईकर आदी उपस्थित राहणार आहेत. या भुमिपूजन सोहळ्यानंतर सायंकाळी 6 वाजता माळीवाड्यातील महात्मा फुले पुतळ्याजवळ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या भूमिपूजन सोहळ्यासह सभेला नागरीकांसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभाग क्रमांक 14 चे माजी नगरसेवक आनंद बाबुराव माळी, माजी नगरसेविका सिंधुताई दशरथ माळी, सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मण दशरथ माळी, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र माळी, प्रभाग क्रमांक 18 चे माजी नगरसेवक गौरव प्रकाश चौधरी, माजी नगरसेविका संगिता संजय (संतोष) वसईकर, पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अमोल बागुल, सा.बां.विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली पाटील यांनी केले आहे.









