Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तोरणमाळ येथे यात्रेनिमित्त जड वाहनांना बंदी,नियमांचे भंग करणार्‍यांवर कडक कारवाई : पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील

team by team
February 14, 2023
in क्राईम
0
सारंगखेडा मार्गाने होणार्‍या अवजड वाहनांच्या वाहतुकीला ७ ते ३१ डिसेंबर दरम्यान बंदी : पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील

नंदुरबार l प्रतिनिधी

 

धडगांव तालुक्यातील तोरणमाळ येथे १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला श्री.महादेव व गोरक्षनाथाची मोठी यात्रा भरत असते त्यानिमीत्ताने दि. १६ ते १९ फेब्रुवारीपर्यंंत तोरणमाळ जाण्यासाठी जड वाहनांना बंदी घालण्यात आली असुन विविध नियम तयार करण्यात आले असुन नियमांचे भंग करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा ईशारा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी दिला.

 

 

धडगांव तालुक्यातील तोरणमाळ येथे १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला श्री.महादेव व गोरक्षनाथाची मोठी यात्रा भरत असते त्यानिमीत्ताने दि. १६ ते १९ फेब्रुवारीपर्यंंत तोरणमाळ येथे यात्रेच्या ठिकाणी जाणारा रस्ता हा घाटातील असुन अरुंद व नागमोडी वळणाचा आहे. त्यामुळे सार्वजनिक रहदारीस अडथळा येवून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाययोजना म्हणुन व यात्रेच्या कालावधीमध्ये तेथील लोकांना धोका पोहचू नये, अडथळे निर्माण होवू नयेत व गैरसोय टाळावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी म्हसावद ते तोरणमाळ रोडवरील राणीपूर या गावाच्या पुढे कुठल्याही प्रकारची जड वाहने उदा. ट्रक, ट्रॅक्टर आणि ट्रॉली (एस. टी मिनीबस सोडून) तोरणमाळकडे जाणार नाही.

 

 

 

अशी वाहने राणीपूर येथे थांबविण्यात येतील.ज्या वाहनांना प्रवासी वाहतुक करण्याचा परवाना नाही असे कोणतेही वाहन तोरणमाळकडे प्रवाशी वाहतुकीसाठी जाणार नाही.ज्या वाहनांना परिवहन विभागाचा परवाना देण्यात आलेला आहे. परंतु क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत आढळतील त्यांना मौजे राणीपूर येथील बेसकॅम्पवर जास्तीचे प्रवासी उतरविले जावून संबधीत वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.राणीपूर येथून हलकी वाहने ज्यामध्ये एस. टी. च्या लहान व मोठया बसेस प्रवासी वाहतुक परवाना धारक जीप, टॅक्सी (फक्त क्षमतेप्रमाणे प्रवासी असलेल्या) यांनाच सोडण्यात येईल.तोरणमाळ घाटावर पोलीस चौकी पुढील आश्रमशाळेजवळील मैदानात निश्चित केलेल्या ठिकाणीच वरील वाहने प्रवाशांना उतरवतील व तेथुनच पुन्हा परतीसाठी नेतील.

 

 

 

इतरत्र वाहने थांबवून प्रवासी भरणार्‍या व उतरविणार्‍या वाहन चालकांविरुध्द मुंबई पोलीस कायदा कलम १०२ चे उल्लंघन ११७ प्रमाणे व मोटार व्हिकल ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्यात येईल, तोरणमाळ येथे वाहतुक करणार्‍या सर्व वाहन चालकांनी व मालकांनी आपल्या वाहनांचे ब्रेक्स व दिवे सुस्थितीत असल्याबाबत खात्री करुन घ्यावी.कोणत्याही वाहन चालकाने मद्य सेवन करून वाहन चालवू नये. मद्य सेवन करून वाहन चालविणार्‍या चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यांत येईल असे आदेश पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी दिले.

बातमी शेअर करा
Previous Post

विजय चौधरींना मिळाले भाजपाचे स्टार प्रचारकांच्या यादीत मानाचे स्थान

Next Post

रस्ता दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे खड्ड्यांमध्ये अनोखे आंदोलन

Next Post
रस्ता दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे खड्ड्यांमध्ये अनोखे आंदोलन

रस्ता दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे खड्ड्यांमध्ये अनोखे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add