नंदूरबार l प्रतिनिधी
शहरातील पातळगंगा नदी किनारी असलेल्या पुरातन श्री गजानन महाराज मंदिरात सद्गुरु सेवा संघ,श्री.गजानन महाराज मंदिर,भक्त परिवार नंदुरबार यांच्यातर्फे सद्गुरु गजानन महाराज यांचा १४५ वा प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाविकांनी सकाळी श्रींच्या रजत मुखवट्याची वाजत गाजत मिरवणूक पालखी सोहळा संपन्न झाला .
शहरातील मुख्य रस्त्यावर भाविकांनी पालखीचे स्वागत केले.आरती नंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.शहरातील गजानन महाराज मंदिरापासून साक्री नाका ते सराफ बाजार, सोनार खुंट, गणपती मंदिर,घी बाजार ,असोदेकर यांच्या दुकानावरून हनुमान व्यायाम शाळा,श्री सिद्धिविनायक मंदिर, काका गणपती, शिवाजी चौक , हिरालाल काका यांचे घर तेथून साक्री नाका आणि श्री.गजानन महाराज मंदिर येथे पालखीचा समारोप झाला. दुपारी श्री. गजानन महाराज मंदिरावर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आयोजन सद्गुरु सेवा संघ,श्री.गजानन महाराज मंदिर,भक्त परिवार यांनी केले होते.








