Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत मोबाईल व्हॅनचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

team by team
February 14, 2023
in राज्य
0
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत मोबाईल व्हॅनचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ
 नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत मोबाईल व्हॅनचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सदर वाहन 13 ते 17 फेब्रुवारी या पाच दिवसामध्ये जिल्हयातील एकुण 19 कृषि मंडळामध्ये प्रत्येकी एक दिवस या प्रमाणे प्रचार प्रसिध्दी करणार आहेत.
आत्म निर्भर भारत पॅकेज अंतर्गत संपुर्ण देशभर सुरु असलेल्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची जिल्हयामध्ये संथ गतीने प्रगती सुरु असल्याने योजनेस व्यापक प्रमाणात प्रचार प्रसिध्दी देण्यासाठी चार मोबाईल व्हॅन पुणे येथुन पुरविण्यात आलेले आहे. प्रकल्प मंजुरीची संख्या कमी असणारे तसेच आकांक्षीत जिल्हे म्हणजेच नंदुरबार, बीड, हिंगोली व परभणी या चार जिल्हयामध्ये मोबाईल व्हॅन व्दारे प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
 मे. अँगल, ऍडव्हटायझिंग पुणे या संस्थेस प्रचार व प्रसिध्दी करणे साठी जवाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हयासाठी एकुण चार मोबाईल व्हॅन पुणे येथुन पाठविण्यात आले असून त्यामध्ये एकुण 30 मिनीटाची चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. या मध्ये लाभार्थी पात्रता निकष तसेच जिल्हयामध्ये वाव असलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत माहिती देण्यात आली आहे. या शिवाय घडी पुस्तीकेचे वाटप ही करण्यात येणार आहेत. सदर मोबाईल वाहने दि. 13 ते 17 फेब्रुवारी या पाच दिवसामध्ये जिल्हयातील एकुण 19 कृषि मंडळामध्ये प्रत्येकी एक दिवस या प्रमाणे प्रचार प्रसिध्दी करणार आहेत.
सदर प्रचार प्रसिध्दी साठी प्रत्येक मंडळात जास्तीत जास्त जनसंपर्क असणारे स्थळे जसे बँका, शासकीय कार्यालय, बस स्थानके, रेल्वे स्टेशन या सारखे स्टॉप पॉईंट नेमुन देण्यात आलेले आहेत. सदर योजना नंदुरबार सारख्या कृषि पुरक जिल्हयास मुल्यवाढ व रोजगार निर्मितीसाठी अत्यंत चांगली योजना असून जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन श्रीमती मनिषा खत्री, जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी केले आहे. या प्रसंगी जिल्हा नोडल अधिकारी विजय मोहिते, तालुका कृषी अधिकारी स्वप्नील शेळके,  जिल्हा संसाधन व्यक्ती विशाल घरटे, कृषि सहाय्यक उत्सव पाटील व  कृषि सहाय्यक अक्षय वसावे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे आज रास्ता रोको आंदोलन 

Next Post

जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन, जिल्हाभरातून ४७ उपकरण सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add