नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार, शहादा व अक्क्लकुवा येथून चार दुचाकी अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील जगतापवाडी येथून पंढरीनाथ शामराव धनगर यांची १२ हजार रूपये किंमतीची दुचाकी (क्र.एम.एच.३९-एम.३३४९) शहादा येथून राहणार्या विनोद विठ्ठल सोनवणे यांची २० हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (क्र.एम.एच.३९-एम.३०००) ही अज्ञात चोरटयाने भाऊतात्या पेट्रोल पंपासमोरून लंपास केली तसेच शहादा येथील मोहिदा रस्त्यावर असलेल्या वंदोत हॉस्पिटलसमोरून तालुक्यातील लंगडीभवानी येथे राहणार्या श्रावण जामसिंग पावरा याची १२ हजाराची दुचाकी लंपास केल्याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात विशाल बाबुलाल पावरा रा.कळपांढरी, वडगांव (ता.शहादा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे राहणार्या राजेंद्र मगन चौधरी यांची ४० हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (क्र.एम.एच.३९-आर. ८७५५) अज्ञात चोरटयांनी लंपास केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवसात जिल्ह्यातील चार दुचाकी लंपास झाल्याची घटना घडली आहे.








