म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कोठली येथे त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त महा रक्तदान शिबिर घेण्यात आले.
यावेळी भन्ते आनंदजी, सारंगखेडा पोलीस स्टेशन येथील पी.आय श्री.शिरसाठ यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी युवकांनी रक्तदान केले यावेळी सारंगखेडा येथील माजी जिल्हा परिषद सभापती जयपालसिंह रावल हे प्रमुख पाहुणे म्हणून व राहुल पाटील, शरद गवळे ग्रामपंचायत उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमात व्यंकटराव गवळे अंबर शिरसाठ राजेंद्र गवळे, नाना टेलर, प्रा. ज्ञानेश्वर गवळे यांचे मार्गदर्शन लाभले. संदिप शिरसाठ ,विशाल साळवे ,अर्जुन गवळे, वंचित बहुजन युवा आघाडीचे नंदुरबार कार्याध्यक्ष व सर्व मित्र परिवाराने यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मेहनत घेतली व समस्त समाज बांधव माता बघिनी युवा मित्र मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरात बहुसंख्य युवकांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गवळे यांनी केले तर आभार संतोष गवळे यांनी मानले.








