नंदुरबार l प्रतिनिधी
शहरात जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १०० खाटांचे माता व बालसंगोपन रुग्णालयासह विविध कामांचे भूमीपूजन व उद्घाटन सोहळा आज दि.९ रोजी आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित व खा.डॉ.हीना गावित उपस्थित राहणार आहेत.
यात जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १०० खाटांचे माता व बालसंगोपन रुग्णालय, ३० बेडचे आयुष हॉस्पीटल इमारत, नंदुरबार येथे कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग व उपविभागीय अधिकारी, सा.बां. उपविभाग क्र. १ व २ कार्यालय इमारतीचे बांधकाम, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन नंदुरबार यांच्या कार्यालयाचे बांधकाम, अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम, उपजिल्हा रुग्णालय, नवापुर येथे ट्रामा केअर युनिटचे उद्घाटन, नवापूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर येणार आहे.
अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात चौक सुशोभिकरण कामाचा शुभारंभ यासह विविध कामांचे उद्घाटन व भूमीपूजन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.








