नवापूर l प्रतिनिधी
जातिवाद प्रांतवाद भाषावाद सोडून आपण हिंदू आहोत हे एकच लक्षात ठेवले पाहिजे जगाच्या कानाकोपऱ्यावर देव, देवतांना धर्माला मानणारा आपली सनातन संस्कृती जपणारा व्यक्ती असेल तर तो आपला हिंदू बांधव आहे ही भावना रुजवली पाहिजे तरच आपण हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र कायम टिकवू शकतो असे प्रखर मत कालीचरण महाराज यांनी हिंदू मेळाव्या प्रसंगी केले.

विश्व हिंदू परिषद बजरंग दल नवापूर प्रखंड व हिंदू मेळावा आयोजन समितीच्या वतीने शहरात ५ फेब्रुवारीच्या सायंकाळी भव्य हिंदू मेळावा झाला. मेळाव्याला प्रमुख वक्ते राष्ट्रीय संत कालीचरण महाराज यांनी आशीर्वचन करतांना केले. शहरातील श्री शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी हिंदू मेळावा झाला. देवमोगरा मातेची आरती करून मेळाव्यास सुरुवात केली. उपस्थित संत महंतांचे स्वागत सत्कार कालीचरण महाराजांनी केले.
मेळाव्यात तालुक्यातील धारेश्वर मंदिराचे संत रुद्रपुरी महाराज, दत्त उपासक नरेंद्र निळकंठ जोशी (बाबा काका) व्याराचे रविबापू महाराज, साक्री येथील प्रजापती ब्रह्मकुमारी संप्रदायाचे शिला दिदि, बीएपीएस स्वामिनारायण संप्रदाय उकाई मंदिराचे साधक कृणाल अहीर, तालुक्यातील लालबरीचे दत्त उपासक वसंत महाराज, मौलीपाडाचे जमनादास महाराज, बर्डीपाडाचे जामसिंगबाबा महाराज, सुकलवेचे चामुंडामाता मंदीराचे महंत गुमांसिंग महाराज, वडकुटचे जालमसिंग महाराज, छापटीचे छीड्यादास महाराज, कुकरांनचे भीमा महाराज, रंजनपुरचे जितू महाराज, कोळद्याचे गोपाल महाराज, बिलगव्हाण येथील भातीजी महाराज संप्रदायाचे प्रेमलाल महाराज, उमराण येथील मोक्षमार्गी संप्रदायाचे मजनू दादा महाराज, बंधारे येथील दासुभाई महाराज, शेहीचे प्रल्हाद महाराज, स्थानिक आदिवासी जनजातीचे संत उपस्थित राहणार आहे. आदी संतगण उपस्थित होते.

कालीचरण महाराज म्हणाले की, आपल्या सनातन धर्माचे रक्षण करणे आवश्यक आहे. धर्म गुरूंनी सत्य परिस्थिती प्रखरपणे समाजासमोर मांडली पाहिजे. ती मांडत असतांना काही कारणास्तव तुरुंगात जाणे परवडेल मात्र साडेबारा हजार वर्षे नरकात जाणे परवडणार नाही. जगाच्या पाठीवर एकमेव हिंदू धर्मात अध्यात्म विज्ञान आहे. धर्माचा प्रसार आणि प्रचार धर्मग्रंथ व धर्मगुरू करतात तर त्याचे संरक्षण राजा करतो. त्यासाठी राजा आपल्याशी एकनिष्ठ असावा. धर्माच्या संरक्षणासाठी प्रभू श्रीरामचंद्र, श्री कृष्ण, महाराणा प्रतापसिंह, छत्रपती शिवाजी महाराज यांनी हातात शस्त्र घेतले यात काही वावग नाही. रामराज्य हवे असेल तर राजा राम हवा. आपण राजकारण्यांचा द्वेष न करता हिंदू वोट बँक बनली पाहिजे. जातीयवाद, भाषावाद, प्रांतवाद, वर्णवाद सोडून फक्त हिंदुत्ववादी अमलात आणावे. आपली संघटन शक्ती दाखवण्याची वेळ आली आहे. आपले संघटन मजबूत राहिले तरच आपले हिंदुत्व अबाधित राहील, याबाबत गाफील राहु नका, हिंदुत्व संपविण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू आहेत.
लव्ह जिहाद, जमीन जिहाद, साधुसंताची बदनामी असे अनेक प्रकारचे षडयंत्र सुरू आहेत. हे सर्व मनसुबे हाणून पाडायचे असतील तर आपल्यात एकोपा पाहिजे. पोलिस प्रशासन व सीमेवरील फौज यावर अवलंबून चालणार नाही त्यांच्या ही मर्यादा आहेत. स्वतः जबाबदार बना, स्वतःचे, परिवाराचे आणि आपल्या धर्माचे रक्षणकर्ता बना. धर्मातर थांबवले पाहिजे, आपल्या बांधवांना जवळ केले पाहिजे असा सल्ला ही कालीचरण महाराजांनी दिला.यावेळी उपस्थित संत महंतांनी मनोगत व्यक्त केले.
दुपारी चार ते पाच दरम्यान गांधी पुतळा समोरील हनुमानजी मंदिरापासून शोभा यात्रा काढण्यात आली. जय श्री राम या जय घोषणेने नवापूर शहर निनांदले. मेळाव्याला नवापूर शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल नवापूर प्रखंड व हिंदू मेळावा आयोजन समितीच्या वतीने करण्यात आली होती आयोजित हिंदू मेळाव्या निमित्ताने शहरासह तालुक्यातील व्यापारी आपला व्यवसाय दुपारून बंद ठेवून मेळाव्याला उपस्थित होते.
यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक, डोकारे साखर कारखान्याचे अध्यक्ष भरत गावीत, नगराध्यक्षा हेमलता पाटील, जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण सभापती संगीता गावीत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनी नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. किरण टिभे व आयोजक समिती अध्यक्ष कमलेश पाटील यांनी प्रास्ताविक केले महेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्यात उपस्थित भाविक, नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.








