शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी वार्षिक विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा 53 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ महात्मा गांधी सभागृहात शनिवारी सकाळी संपन्न झाला.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शहादा-तळोदा मतदार संघाचे आ. राजेश पाडवी, मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, संचालक रमाकांत पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील यांच्यासह विविध विद्याशाखांचे प्राचार्य बी.के.सोनी,डॉ .एन.जे.पाटील डॉ .एस.पी.पवार, डॉ.पी.एल.पटेल उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आ. राजेश पाडवी म्हणाले की, या शिक्षण संकुलामुळे अनेक गोरगरीब, आदिवासी , शेतकरी, शेतमजूर आदि सर्वांच्याच मुलामुलींना शिक्षणाची चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. येथील अनेक विद्यार्थी देश-विदेशात मोठ्या जागांवर कार्यरत असून आपल्या परिसराचा नावलौकीक वाढवत आहेत. या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांनी यशासाठी धाडसाने व आत्मविश्वासाने पुढे यावे.

अध्यक्षीय भाषणात दिपक पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी दररोज कष्ट घेतले पाहिजेत. आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य असले पाहिजे.आपल्या आवडीनुसार शिक्षण व अभ्यासक्रमाची निवड केली पाहिजे. शिक्षणात चांगले यश मिळवल्यानंतर रोजगाराचा खूप संधी अर्थ व्यवस्थेमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मागे राहू नये. भारतीय संस्कृती बरोबरच संस्कारांची जपवणूक केली पाहिजे. कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले .कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस.पाटील यांनी आपल्या प्रास्तविकात प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षेत महाविद्यालयातून 17 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
यात 4 सुवर्ण, 6 रौप्य व 7 कांस्य पदकाचे मानकरी ठरले आहेत. तसेच नेट व सेट परीक्षेत 14 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या सर्वांचा सत्कार पारितोषिक देवून करण्यात आला. गुणवता प्राप्त विद्यार्थी, क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविणारे विद्यार्थी यांचा सत्कार अतिथींच्या हस्ते करण्यात आला. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विविध परीक्षा, क्रीडा स्पर्धा, एन. सी. सी., एन. एस एस, युवारंग, आविष्कार आदि विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थांना पारितोषिक वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डाॅ.वाय.के.शिरसाठ व प्रा.डाॅ. व्ही.ओ.शर्मा यांनी केले. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे यादीवाचन प्रा.आर.व्ही. पाटील, प्रा. व्ही.सी.डोळे, उपप्राचार्या कल्पना पटेल यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








