नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील मच्छी बाजार परिसरात बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली होती.संशयित तरुणाला पोलीसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस दलातर्फे कडक बंदोबस्त लावण्यात आला असून पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
सुत्रांच्या माहितीनूसार, मच्छी बाजार परिसरात राहणाऱ्या जयेश सोनवणे याच्या बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून दि.3 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास नंदुरबार शहरातील बोहरी मशिदला लागून असलेल्या रस्त्यावर सातपर बाबा दर्गाच्या समोर जयेश दयाराम गंगावणे रा. सां. बा. विभाग कार्यालयाच्या शासकीय निवास्थान, मच्छी बाजार, नंदुरबार याने यातील त्याचा मेव्हणा मयत अरबाज खाटीक यांच्या छातीत चाकु खुपसून त्यास गंभीर दुखापत करून जिवेठार मारले याप्रकरणी राज सलिम खाटीक रा. घरकुल जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून जयेश दयाराम सोनवणे रा. सा. बां.विभाग कार्यालयाच्या शासकिय निवास्थान मच्छी बाजार नंदुरबार याच्या विरुद्ध भादवि क ३०२ ५०६ (२) सह महा. पो. का. चे कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित तरुणाला पोलीसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस दलातर्फे कडक बंदोबस्त लावण्यात आला असून पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.








