नंदूरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथे राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला असुन बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी संकल्पना मांडली होती. या करिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी, संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वानी बैठकीला उपस्थित राहुन,या बैठकीमध्ये, देशाच्या, राज्याच्या जिल्ह्याच्या, तालुक्याच्या, सामाजिक, आर्थिक, राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.
याच आवाहनाला प्रतिसाद देत फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या शनिवारी नंदुरबार येथील राष्ट्रवादी भवन जिल्हा कार्यालय येथे एक तास राष्ट्रवादीसाठी या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी केले होते. या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी प्रभागातील असणार्या नागरिकांच्या समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली व सूचना मांडण्यात आल्या.यावेळी नरेंद्र मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. देशात वाढती महागाई, बेरोजगारी देशाची आर्थिक परिस्थिती विदारक असून देश आर्थिक मंदीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे, वाढत्या महागाईवर लोकसभेत विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारल्यावर बोलु दिले जात नाही.राज्याचे मंत्रिमंडळला साथ महिने पूर्ण झाले तरी, महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार नाही. या शिंदे- फडणवीस सरकारने राज्यातील जनतेला वार्यावर सोडले आहे. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असताना त्याकडे सोयीने दुर्लक्ष केले जात आहे असे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी सांगीतले.
या बैठकीस राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव ऍड.राऊ् मोरे, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष बबलु कदमबांडे, सोशल मिडिया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे, सेवा दल जिल्हाध्यक्ष रविंद्र जावरे, युवक शहराध्यक्ष लल्ला मराठे, युवक तालुकाध्यक्ष दिनेश माळी, ओबीसी जिल्हा समन्वयक निलेश चौधरी, शहर उपाध्यक्ष राजा ठाकरे, विद्यार्थी सेल शहराध्यक्ष जयेश मराठे, धनराज बच्छाव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.








