म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद सह अनेक गावातील रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे यामुळे नागरिकांसह वाहन धारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.अशा रस्त्यामुळे रोजच लहान मोठे अपघात होत असल्याचे समोर येत आहे.या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी नागरिकांनी अनेकवेळा केली मात्र याकडे संबंधिताचे दुर्लक्ष असल्याने अखेर नागरिकांनी ६ फेब्रुवारी रस्ता रोको आंदोलन करण्याचे घेतला आहे.
या संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँगेस कमिटी च्या पदाधिकाऱ्या कडून शहादा तहसीलदार, शहादा बांधकाम विभाग,शहादा पोलीस स्टेशन, म्हसावद पोलिस स्टेशन, अशा ठिकाणी याबाबत निवेदन देण्यात आले आहे.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी चे कार्याध्यक्ष सुभाष पाटील,युवा जिल्हाअध्यक्ष निलेश पाटील,शहादा तालुका अध्यक्ष डॉ.सुरेश नाईक,प्रभारी अध्यक्ष योगेश पावरा,जिल्हा अध्यक्ष दिलीप पवार,माजी उपसभापती किशोर पाटील,डॉ.जाधव ठाकरे,सत्येनं वळवी,प्रकाश पवार,मिलिंद अहिरे यांच्यासह परिसरातील काँग्रेस कमिटी चे कार्यकर्तेसह सरपंच, उपसरपंच, उपसरपंच व नागरिक उपस्थित होते.
६ फेब्रुवारी रस्ता रोको चे आंदोलन ची चाउल लागताच काही ठेकेदारांनी रस्त्याची डागडुगी करण्यास सुरुवात केली आहे यात म्हसावद ते चिखली कानडी या रस्त्याची खूपच अवस्था बिकट झाली होती त्याची दुरुस्ती करण्यास सुरुवात संबंधित ठेकेदार ने कामास सुरुवात केली आहे.