म्हसावद l प्रतिनिधी
विद्या गौरव इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि त्रिमूर्ती महिला महाविद्यालय आमलाड यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेह संमेलनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरस्वती माता व याहा मोगी माता यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थिताच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालक समितीचे अध्यक्ष राजकुमार पाडवी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा विद्यादेवी तांबोळी,सेवानिवृत्त सहा प्रकल्प अधिकारी अशोक तांबोळी,अनन्या तांबोळी,हर्षवर्धन तांबोळी,मुख्याध्यापक एन.व्ही.मराठे
जंजार पावरा,ईश्वर पावरा,तुकाराम पावरा उपस्थित होते.त्यानंतर उपस्थित्यांचे हस्ते दीप प्रज्वलीत करून करण्यात आले.त्यानंतर सर्व उपस्थित्यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शाळेचा सन 2022-23 चा प्रगतीपट ललित पाठक यांनी मांडला.त्यानंतर क्रीडा क्षेत्रात राज्य स्तरीय निवड झालेला तुषार वसावे हा उंच उडी या स्पर्धेत निवड झाल्याने त्याचा सत्कार प्रशस्तीपत्र व मेडल देऊन करण्यात आला यावेळी नर्सरी ते महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य,विविध विषयांवर नाटके,आदिवासी नृत्य,गीते सादर करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.विविध नाटके व नृत्य व्दारे समाजासाठी रियल हिरो,पालक व पैसा,अन्न व एकता यासर्व मुख्य जीवनशैली चे विद्यार्थ्यांनी महत्व पटवून दिले.यावेळी संस्था अध्यक्षा,संचालक मंडळ,प्रमुख पाहुणे,पालक वर्ग यांनी शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.शाळेने विविध उपक्रम राबवून शाळेचे नावलौकिक मिळविला.
सूत्रसंचालन शिक्षक किरण वसावे,शिक्षिका प्रीती बुनकर,विद्यार्थ्यांनी कल्पना पावरा तसेच 12 वी चे विद्यार्थी शितल ईश्वर वसावे,हर्षल पावरा व जयपाल पाडवी यांनी केले तर आभार शिक्षक संजय मोरे यांनी केले.यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.