शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दत्तक गाव पुरुषोत्तमनगर येथे डिजिटल इंडिया मोहीम अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले.
त्याअंतर्गत ग्रामीण भागात विविध डिजिटल सोयी सुविधांचा वापर, शासकीय सुविधा, डिजिटल बँकिंग चे पर्याय इ. बाबी संबंधी ऑनलाईन पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले. त्यासोबतच रासेयो स्वयंसेवकांनी गावातील वसाहतीत सोशल मेडियाचे दुष्परिणाम, रस्ता सुरक्षा, प्लास्टिक वापर प्रतिबंध, महिला सशक्तीकरण, बालविवाह प्रतिबंध, ग्राम विकासात युवकांचा सहभाग, डिजिटल इंडिया इ. विविध विषयांवर पथनाट्य सादर केलेत. बालक-युवक संवाद या निमित्ताने पुरुषोत्तमनगर येथील वाल्मिकी माध्यमिक विद्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण संबधी आवड निर्माण व्हावी,
शाळा गळतीचे प्रमाण कमी व्हावे, सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून रासेयोतर्फे प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सदर कार्यक्रमास अतिशय उत्साहाने प्रचंड प्रतिसाद दिला. वाल्मिकी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा पाटील आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींनी सदर कार्यक्रमास सहकार्य केले.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील, उपप्राचार्य डॉ. एम.के.पटेल, डॉ. एस.डी. सिंदखेडकर यांनी उपक्रमाचे कौतुक केले. प्रा. राजेंद्र पाटील प्रा. वजीह अशहर, प्रा. वर्षा चौधरी यांनी मार्गदर्शन केले.