नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था आयोजित शेळी पालन प्रशिक्षण दि. 31 आँगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत खडकी ता़ नवापूर येथे आयोजित केले होते ़
नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार उभारणीसाठी प्रोत्साहीत करण्यासाठी आरसेटीची स्थापना ग्रामीण विकास मंत्रालयाने केली आहे, सदर शेळी पालन प्रशिक्षण कार्यक्रमात खडकी येथील एकूण 30 स्वयं सहाय्यता समूहातील महिलांची निवड करण्यात आली होती. प्रशिक्षणाचा हेतू स्वयं सहाय्यता सदस्य चे शेती पुरक व्यवसायाचे तांत्रिक आणि शास्त्रीय प्रशिक्षण देणे होते हा होता, प्रशिक्षणा दरम्यान प्रत्यक्ष शेळ्यांना औषध कसे पाजावे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले, आरसेटी संस्थेचे संचालक अंकुश खंदारे, गिरधर बैसाणे, डॉ फिरोज शेख यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना मार्गदर्शन केले. दि. 9 सप्टेंबर रोजी सदर प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता व प्रमाण पत्र वाटप डॉ. महेश गणापुरे, अंकुश खंदारे, गिरधर बैसाणे यांच्या हस्ते करण्यात आले.