Public
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public
No Result
View All Result

पूजेसाठी आलेले दोघे भाऊ तापीत गेले वाहून गेले, एकाला वाचविण्यात यश, दुसरा बेपत्ता

Mahesh Patil by Mahesh Patil
September 13, 2021
in क्राईम
0
पूजेसाठी आलेले दोघे भाऊ तापीत गेले वाहून गेले, एकाला वाचविण्यात यश, दुसरा बेपत्ता

प्रकाशा | प्रतिनिधी
प्रकाशा येथील तापी घाट वर आजोबांच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या सामूद्रे कुटुंबातील  दोघे भाऊ अंघोळीला गेले असतांना एक जण वाहून गेला तर दुसर्‍याला वाचविण्यात नावाडयांना यश आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहादा तालुक्यातील प्रकाशा  येथील सिध्दार्थनगरमध्ये राहणारे रविन भिमा सामुद्रे यांच्या वडीलांचे चार दिवसांपुर्वी निधन झाले. त्यामुळे ते परिवारासह पुजाविधी व दशक्रिया विधीसाठी  प्रकाशा येथील घाटावर आले होते. कार्यक्रम सुरु असतांना त्यांची दोघे मुले राज सामुद्रे व गौतम सामुद्रे हे आंघोळीसाठी तापी नदीच्या पात्रात उतरत असतांना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याच्या प्रवाहासोबत राज रविन सामुद्रे (वय १६) हा वाहून गेला तर गौतम सामुद्रे हा पाण्यात वाहत असतांना त्याला नावाडी रमेश सना ठाकरे व जयसिंग ठाकरे यांनी काही अंतरावर जावून पकडले. त्यामुळे त्याला वाचविण्यात यश आले आहे. गौतम यास उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. राज रविन सामुद्रे हा पुराचा पाण्यात वाहून गेला. त्याला शोधण्यासाठी दिवसभर शोधमोहीम सुरू होती. घटनेची माहिती मिळताच प्रकाशा येथील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे सिध्दार्थनगर शोककळा पसरली आहे. गेल्या आठवडयापासून तापी नदीच्या उगम क्षेत्रात दमदार पाऊस होत असून हातनूर धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यातच प्रकाशा बॅरेजवरील दरवाजे उघडल्याने पाणीसाठा वाढला आहे. रात्री उशिरापर्यंत राज सामुद्रे याचा शोध घेण्याचे कार्य युध्दपातळीवा सुरू होते. तापी नदीच्या काठावर कोणीही जावू नये, असे आवाहन शहादा पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांनी केले. प्रकाशा येथील पोलीस हवालदार सुनिल पाडवी, अलिम मन्यार घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर, मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता लागू

Next Post

भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार कार्यक्रम अंतर्गत शेळी पालन प्रशिक्षण

Next Post
भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार कार्यक्रम अंतर्गत शेळी पालन  प्रशिक्षण

भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार कार्यक्रम अंतर्गत शेळी पालन प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत चोखावाला शाळेतील विद्यार्थीनी एलिना शेख नवापूर केंद्रात प्रथम

राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत चोखावाला शाळेतील विद्यार्थीनी एलिना शेख नवापूर केंद्रात प्रथम

July 3, 2022
सार्वजनिक जागी वाढदिवस साजरा करणे पडले महागात, ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सार्वजनिक जागी वाढदिवस साजरा करणे पडले महागात, ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2022
पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2022
तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील चार विद्यार्थी घेतले दत्तक

तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील चार विद्यार्थी घेतले दत्तक

July 3, 2022
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेश वसावे यांचा गौरव

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेश वसावे यांचा गौरव

July 3, 2022
मानमोड्या शिवारात वनजमीनीवर रात्री नांगरटी करणाऱ्या चौघांना अटक, सात लाखाचा मुद्देमाल जप्त

मानमोड्या शिवारात वनजमीनीवर रात्री नांगरटी करणाऱ्या चौघांना अटक, सात लाखाचा मुद्देमाल जप्त

July 2, 2022

एकूण वाचक

  • 1,691,508 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group